आफ्रिदीच्या भारतीय चाहत्याला अटक
By Admin | Updated: December 22, 2016 00:22 IST2016-12-22T00:22:44+5:302016-12-22T00:22:44+5:30
पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याचा चाहता असलेल्या रिपन चौधरी याला अटक करण्यात आली आहे. चौधरी याने आसाममधील

आफ्रिदीच्या भारतीय चाहत्याला अटक
कराची : पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याचा चाहता असलेल्या रिपन चौधरी याला अटक करण्यात आली आहे. चौधरी याने आसाममधील एका सामन्यात आफ्रिदीची जर्सी घातली होती. त्याबाबत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली. त्यामुळे चौधरीला अटक केली आहे. याबाबत आफ्रिदीने निराशा व्यक्त केली.
एका पाकिस्तानी वृत्तपत्रात आफ्रिदीने म्हटले की, ‘या प्रकारची घटना योग्य नाही. क्रिकेट सोबत राजकारण होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, ज्याप्रमाणे पाकिस्तानात भारतीय क्रिकेटपटूंचे चाहते आहेत. त्याचप्रमाणे भारतातही आहेत. ’’
फेब्रुवारीत विराट कोहलीच्या चाहत्याला पाकिस्तानात दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. (प्रतिनिधी)