भारतीय क्रिकेटपटूंनी घेतला बीच व्हॉलिबॉलचा आनंद

By Admin | Updated: July 8, 2016 19:20 IST2016-07-08T19:20:50+5:302016-07-08T19:20:50+5:30

भारतातून लांबच्या प्रवासानंतर विंडीजमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाने शनिवारपासून प्रारंभ होणाऱ्या दोन दिवसीय सराव सामन्यापूर्वी बीच व्हॉलिबॉलचा आनंद घेतला.

Indian cricketers take pleasure in beach volleyball | भारतीय क्रिकेटपटूंनी घेतला बीच व्हॉलिबॉलचा आनंद

भारतीय क्रिकेटपटूंनी घेतला बीच व्हॉलिबॉलचा आनंद

सेन्ट किटस : भारतातून लांबच्या प्रवासानंतर विंडीजमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाने शनिवारपासून प्रारंभ होणाऱ्या दोन दिवसीय सराव सामन्यापूर्वी बीच व्हॉलिबॉलचा आनंद घेतला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया शनिवारी सेन्ट किट््समधील वॉर्नर पार्कमध्ये विंडीज अध्यक्ष इलेव्हविरुद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. यानंतर दुसरा सराव सामना याच मैदानावर १४ जुलैपासून खेळला जाणार
आहे.
सेन्ट किट््स विंडीजमधली सर्वांत शानदार बेटांपैकी एक असून  शुगर सिटी म्हणून ओळखल्या जाते. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अन्य खेळाडूंनी बराच वेळ बीच व्हॉलिबॉलचा आनंद घेतला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टिष्ट्वटरवर एक छायाचित्र पोस्ट केले असून त्यात खेळाडू व्हॉलिबॉल खेळताना दिसत आहेत.
बीसीसीआयने एक मिनिट १४ सेकंदाचा एक व्हिडीओ अपलोड केला असून त्यात खेळाडू बीच व्हॉलिबॉल खेळताना दिसतात. विराटसह काही खेळाडू शॉर्टलेस होते तर काही खेळाडूंनी निळ्या रंगाचा भारतीय संघाचा टी-शर्ट परिधान केला
होता. टीम इंडियाने शुक्रवारीही सराव केला. 

Web Title: Indian cricketers take pleasure in beach volleyball