भारतीय बॉक्सर्सना कठीण ड्रॉ, यांच्या कामगिरीवर नजर...
By Admin | Updated: August 5, 2016 20:27 IST2016-08-05T20:27:26+5:302016-08-05T20:27:26+5:30
भारताच्या तीन सदस्यीय बॉक्सिंग पथकाला आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या अॉलिम्पिक बॉक्सिंगमध्ये कठीण ड्रॉ मिळाला आहे

भारतीय बॉक्सर्सना कठीण ड्रॉ, यांच्या कामगिरीवर नजर...
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. ५ : भारताच्या तीन सदस्यीय बॉक्सिंग पथकाला आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या अॉलिम्पिक बॉक्सिंगमध्ये कठीण ड्रॉ मिळाला आहे. बॉक्सिंगमध्ये भारताने आतापर्यंत दोन पदके जिंकली आहेत. बीजिंगमध्ये २००८ साली विजेंदरसिंगने ७५ किलोचे कांस्य तसेच २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये मेरिकोमने महिला बॉक्सिंगचे ५१ किलो गटात कांस्य जिंकले होते.
शिवा थापा ५६ किलो, मनोज कुमार ६४ किलो आणि विकास कृष्णन ७५ किलो यांच्या खांद्यावर भारतीय आव्हानाची जबाबदारी राहील. मागच्या लंडन आॅलिम्पिकमध्येआठ बॉक्सर्स खेळले होते. यंदा विकासला सातवे मानांकन मिळाले पण कुणालाही पहिल्या फेरीत पुढे चाल मात्र मिळालेली नाही.
आशियाडचा सुवर्ण विजेता आणि विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदकाची कमाई करणारा विकासचा सामना १० आॅगस्ट रोजी अमेरिकेचा १८ वर्षांचा खेळाडू चार्ल्स कोनवेलविरुद्ध होईल. त्याआधी शिवाला ९ आॅगस्ट रोजी क्यूबाचा सहावा मानांकित रोबेइसी सामिरेज याच्याविरुद्ध खेळायचे आहे. २०१० च्या युवा आॅलिाम्पिकच्या अंतिम फेरीत शिवाला रोबेइसीकडून पराभवाचा धक्का बसला आहे. मनोज १० आॅगस्ट रोजी लिथुआनियाचा माजी युवा आॅलिम्पिक सुवर्ण विजेता एवाल्डास पेत्राउस्कास याच्याविरुद्ध खेळेल.
राष्ट्रीय महासंघात भांडणे सुरू असल्याने देशात या खेळाची अधोगती झाली. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने भारतीय बॉक्सिंग फेडरेशनला निलंबित केल्यामुळे चार वर्षांपासून सिनियर नॅशनलचे आयोजनच होऊ शकले नाही.
बॉक्सर्सना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची देखील संधी मिळाली नाही. रिओ आॅलिम्पिक पथकात कुणी नवा चेहरा स्थान मिळवू शकला नसला तरी शिवा, विकास आणि मनोज यांचा अनुभव दांडगा आहे. चार वर्षांआधी शिवा भारतीय बॉक्सिंग
पथकातील सर्वांत लहान वयाचा खेळाडू होता. तो पराभूत झाला, पण यंदा त्याच्याकडूनच आशा आहे.
विकास विश्व रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर आहे. लंडन आॅलिम्पिकमध्ये वादग्रस्त निर्णयाद्वारे त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. विकासचा रिव्ह्यू देखील फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्याने आश्यिाई स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. बाकू येथे विश्व बॉक्सिंग स्पर्धेद्वारे त्याने रिओचे तिकीट मिळविले आहे. मनोज तिघांमध्ये सर्वाधिक अनुभवी आहे.
लंडनमध्ये स्थानिक खेळाडू थॉमस स्टकरकडून तो पराभूत झाला होता