भारतीय गोलंदाजांची कामगिरी आश्चर्यकारक : सौरभ गांगुली

By Admin | Updated: March 10, 2015 01:12 IST2015-03-10T01:12:15+5:302015-03-10T01:12:15+5:30

वर्ल्डकपपूर्वी आयोजित तिरंगी मालिका आणि त्याआधी झालेल्या काही वन-डे सामन्यांमध्ये भारताच्या एकाही गोलंदाजाला प्रतिस्पर्धी टीमवर दबाव टाकता

Indian bowlers' performance is amazing: Sourav Ganguly | भारतीय गोलंदाजांची कामगिरी आश्चर्यकारक : सौरभ गांगुली

भारतीय गोलंदाजांची कामगिरी आश्चर्यकारक : सौरभ गांगुली


वर्ल्डकपपूर्वी आयोजित तिरंगी मालिका आणि त्याआधी झालेल्या काही वन-डे सामन्यांमध्ये भारताच्या एकाही गोलंदाजाला प्रतिस्पर्धी टीमवर दबाव टाकता आला नव्हता; मात्र वर्ल्डकपमधील भारतीय गोलंदाजांची सध्याची कामगिरी आश्चर्यकारक आहे, असे मत टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने व्यक्त केले आहे़
च्गांगुली म्हणाला, की वर्ल्डकपपूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेत आणि त्याआधी झालेल्या काही वन-डे सामन्यांमध्ये ज्या प्रकारे भारतीय गोलंदाजांची धुलाई झाली होती़ त्यावरून हे गोलंदाज वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करतील, याची अपेक्षा केली नव्हती़
च्सध्या वेगवान गोलंदाज मोहंमद शमी, उमेश यादव यांनी ताशी १४५ कि. मी़ वेगाने गोलंदाजी करून प्रभावित केले आहे़ याव्यतिरिक्त युवा गोलंदाज मोहीत शर्मानेही सुरेख गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाला अडचीत आणले आहे़ या कामगिरीसाठी तीनही खेळाडू कौतुकास पात्र आहेत, असेही हा माजी कर्णधार म्हणाला़
च्भारतीय संघाने वर्ल्डकपमध्ये सलग चार विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे़ आता भारताने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळविल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही़ कारण सध्या भारतीय संघ गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उजवा आहे़ त्यामुळे या संघाला रोखणे प्रतिस्पर्धी संघांना कठीण जाईल यात शंका नाही.

Web Title: Indian bowlers' performance is amazing: Sourav Ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.