भारतीय तिरंदाज लंडनची उणीव भरून काढणार
By Admin | Updated: August 5, 2016 04:05 IST2016-08-05T04:05:52+5:302016-08-05T04:05:52+5:30
आॅलिम्पिकमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत लंडनमध्ये आलेले अपयश पुसून काढण्याचा निर्धार भारतीय तिरंदाजांनी व्यक्त केला

भारतीय तिरंदाज लंडनची उणीव भरून काढणार
रियो- आॅलिम्पिकमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत लंडनमध्ये आलेले अपयश पुसून काढण्याचा निर्धार भारतीय तिरंदाजांनी व्यक्त केला आहे. फुटबॉल आणि तिरंदाजी या खेळांना आॅलिम्पिक उद्घाटनाआधीच सुरुवात होते. १९८८ सेऊल आॅलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश झाल्यापासून भारतीय तिरंदाज सातत्याने सहभागी होत आहेत. २०००मध्ये मात्र भारतीय संघ पात्र ठरू शकला नव्हता. महिला संघ २००४ व २००८ आॅलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता.