शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Asian Para Games 2023 : आशियाई पॅरा स्पर्धेतही भारताचा बोलबाला; PM मोदींकडून पदक विजेत्यांचं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 14:17 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेत विक्रमी १०७ पदकं जिंकल्यानंतर भारतीय शिलेदारांनी आशियाई पॅरा स्पर्धेतही आपले वर्चस्व कायम ठेवले.

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत विक्रमी १०७ पदकं जिंकल्यानंतर भारतीय शिलेदारांनी आशियाई पॅरा स्पर्धेतही आपले वर्चस्व कायम ठेवले. आशियाई पॅरा स्पर्धा २०२३ मध्ये भारताने आतापर्यंत ६४ पदकं जिंकली असून यामध्ये १५ सुवर्ण, २० रौप्य आणि २९ कांस्य पदकांचा समावेश आहे. खरं तर आशियाई पॅरा स्पर्धेच्या क्रमवारीत भारत आताच्या घडीला सहाव्या स्थानावर आहे.  

उझबेकिस्तानला १७ सुवर्ण पदकांसह १७ रौप्य आणि २१ कांस्य पदकं मिळाली असून त्यांच्या नावावर एकूण ५५ पदकांची नोंद आहे. याशिवाय चौथ्या क्रमांकावर असलेल्या थायलंडने एकूण ६३ पदकं जिंकली आहेत. आशियाई पॅरा स्पर्धेच्या गुणतालिकेत ६९ पदकांसह जपान चौथ्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर इराण असून त्यांनी २४ सुवर्ण, ३० रौप्य आणि १९ कांस्य पदकं जिंकली आहेत. तर चीनने सर्वाधिक ३०० पदकं जिंकून आपले वर्चस्व कायम राखले. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचे कौतुक केले. तसेच भारतीय शिलेदारांचा उत्साह वाढवण्यासाठी खास चारोळ्या लिहित त्यांच्या कामगिरीला दाद दिली. नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळाडूंचे अभिनंदन केले.  

 

पदकांच्या यादीत चीन अव्वल स्थानी आशियाई पॅरा स्पर्धा २०२३ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक पदक जिंकणाऱ्यांच्या यादीत चीन अव्वल स्थानी आहे. चीनने ११८ सुवर्ण पदकांसह ९६ रौप्य आणि ८६ कांस्य पदकं जिंकली आहेत. चीनच्या खात्यात ३०० पदकांची नोंद झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत देखील चीनच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदकं जिंकली होती, त्याचाच प्रत्यय इथेही पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीGold medalसुवर्ण पदक