सरावात भारत विजयी

By admin | Published: August 23, 2014 12:53 AM2014-08-23T00:53:44+5:302014-08-23T00:53:44+5:30

कसोटीत सपाटून मार खाणा:या भारतीय संघाने मिडलसेक्स विरुद्धच्या एकमेव वन - डे सराव सामन्यात 95 धावा राखून विजय साजरा केला आहे.

India won the test | सरावात भारत विजयी

सरावात भारत विजयी

Next
लंडन : कसोटीत सपाटून मार खाणा:या भारतीय संघाने मिडलसेक्स विरुद्धच्या एकमेव वन - डे सराव सामन्यात 95 धावा राखून विजय साजरा केला आहे. कर्णधार विराट कोहली (71) व अंबाती रायडू (72) यांच्या अर्धशतकी खेळानंतरही भारताचा डाव  44.2 षटकांत 23क् धावांत आटोपला. या लक्ष्याचा पाठलाग करताना मिडलसेक्स संघ 135 धावांत गारद झाला. कर्न शर्मा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. 
 या एकमेव सराव सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. या सामन्यात विराटने 75 चेंडूंना सामोरे जाताना 71 धावा फटकाविल्या. त्यात 8 चौकार व 1 षटकाराचा समावेश आहे. 82 चेंडूंमध्ये 8 चौकारांच्या मदतीने 72 धावा फटकाविल्यानंतर रायडूने अन्य फलंदाजांना संधी देण्यासाठी निवृत्ती स्वीकारली. रविचंद्रन अश्विनने 18 धावांचे योगदान दिले. विराट व रायडूची 1क्4 धावांची भागीदारी संपुष्टात आल्यानंतर भारताचे अखेरचे 6 फलंदाज केवळ 56 धावांच्या अंतरात माघारी परतले. मिडलसेक्सतर्फे ऑफ स्पिनर ओलिव्हर रेनरने 9.2 षटकांत 32 धावांच्या मोबदल्यात 4 बळी घेतले. 
संक्षिप्त धावफलक : 
भारत - सर्वबाद 23क् धावा (विराट कोहली 71, अंबाती रायडू 72, आर अश्विन 18; रायनर 4-32, रवी पटेल 2-56) विजयी विरुद्ध मिडलसेक्स - सर्वबाद 135 धावा (रायन हिंगिस 2क्, पॉल स्टिर्लिग 17; कर्न शर्मा 3-14). (वृत्तसंस्था)
 

 

Web Title: India won the test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.