पाकिस्तानला नमवून भारताने जिंकला अंधांचा टी-२० एशिया कप
By Admin | Updated: January 24, 2016 18:43 IST2016-01-24T18:43:06+5:302016-01-24T18:43:24+5:30
भारताने पाकिस्तानला ४१ धावांनी नमवून अंधांच्या टी-२० एशिया कपच्या विजेतेपदावर नाव कोरले.

पाकिस्तानला नमवून भारताने जिंकला अंधांचा टी-२० एशिया कप
>ऑनलाइन लोकमत
कोची, दि. २४ - शानदार खेळ करत भारताने पाकिस्तानला ४१ धावांनी नमवून अंधांच्या टी-२० एशिया कपच्या विजेतेपदावर नाव कोरले. या विजयामुळे भारताने ग्रुपटेस्टमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचाही बदला घेतला.
पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या अंधांच्या टी-२० एशिया कपमध्ये भारतीय खेळाडूंनी प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ५ गडी गमावून २०९ धावा केल्या. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचे सर्व गडी अवघ्या १६९ धावांमध्ये बाद झाले आणि भारताने ४१ धावांसह सामन्यात विजय मिळवत स्पर्धेच्या विजेतेपदावरही नाव कोरले.
या पूर्वी ग्रुप टेस्टेमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला १९ धावांनी हरवले होते.