भारत रियोचे स्वप्न साकारण्यासाठी इटलीविरुद्ध खेळणार

By Admin | Updated: July 2, 2015 03:07 IST2015-07-02T03:07:25+5:302015-07-02T03:07:25+5:30

अव्वल मानांकित नेदरलँडकडून ०-७ फरकाने पराभव पत्करलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचे रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे स्वप्न अजूनही भंगलेले नसून उद्या

India will play against Italy to fulfill the dreams of Rio | भारत रियोचे स्वप्न साकारण्यासाठी इटलीविरुद्ध खेळणार

भारत रियोचे स्वप्न साकारण्यासाठी इटलीविरुद्ध खेळणार

एंटवर्प : अव्वल मानांकित नेदरलँडकडून ०-७ फरकाने पराभव पत्करलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचे रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे स्वप्न अजूनही भंगलेले नसून उद्या हॉकी विश्व लीगच्या सेमीफायनलमध्ये इटलीवर मोठ्या अंतराने विजय नोंदवून आपल्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतील. रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भारताला पाचव्या ते आठव्या स्थानासाठी इटलीविरुद्ध होणाऱ्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. इटलीने आॅस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत आपल्या क्षमतेचा नमुना दाखवला होता. (वृत्तसंस्था)

उपांत्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या सर्वच संघांना आॅलिम्पिक क्वॉलिफिकेशनची संधी मिळू शकते आणि अशा स्थितीत भारत प्लेआॅफमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी कटिबद्ध असेल.
भारतीय संघ वेगाने प्रगती करणाऱ्या इटलीविरुद्ध आपला बचाव सुधारण्याचा प्रयत्न करील. भारत जागतिक रँकिंगमध्ये १३ व्या आणि इटली १६ व्या स्थानी आहे. इटलीसाठी वर्ल्डकपमधील रौप्यपदक विजेत्या आॅस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी प्रेरणादायी ठरू शकेल. या सामन्यात पूर्वार्ध आणि उत्तरार्धात मिळवलेल्या प्रत्येकी एका पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून हा सामना आॅस्ट्रेलियाने जिंकला होता. तसे पाहता इटली हा दुबळा प्रतिस्पर्धी नाही.
याआधी डिसेंबरमध्ये झालेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इटलीने २ सामने जिंकले होते, तर भारत फक्त एकच सामना जिंकू शकला होता आणि एक सामना ड्रॉ झाला होता.

Web Title: India will play against Italy to fulfill the dreams of Rio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.