भारत ‘अ’ विजयाचे खाते उघडणार?

By Admin | Updated: August 9, 2015 00:55 IST2015-08-09T00:55:20+5:302015-08-09T00:55:20+5:30

भारत ‘अ’ खेळाच्या सर्व विभागांतील आपल्या दुबळेपणावर मात करताना दक्षिण आफ्रिक ा ‘अ’विरुद्ध तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत उद्या विजयाचे खाते उघडण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

India will open the A 'wins' account? | भारत ‘अ’ विजयाचे खाते उघडणार?

भारत ‘अ’ विजयाचे खाते उघडणार?

तिरंगी वनडे मालिका : आफ्रिकेविरुद्ध आज लढत

चेन्नई : भारत ‘अ’ खेळाच्या सर्व विभागांतील आपल्या दुबळेपणावर मात करताना दक्षिण आफ्रिक ा ‘अ’विरुद्ध तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत उद्या विजयाचे खाते उघडण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
भारत ‘अ’ संघाला काल मालिकेतील पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलिया ‘अ’ने ११९ धावांनी पराभूत केले होते. या पराभवानंतरही प्रशिक्षक राहुल द्रविड यांना चांगल्या कामगिरीची आशा आहे. तथापि, संघाने त्यांनी आखलेल्या व्यूहरचनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
भारताचे मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णी व संदीप शर्मा यांनी सुरुवातीला आॅस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि जो बर्न्स यांना फटकेबाजी करण्यास जास्त वाव मिळू दिला नाही. सराव सत्रादरम्यान द्रविडने बराच वेळ गोलंदाजांसोबत व्यतीत केला आणि गोलंदाजांना योग्य टप्प्यावर चेंडू टाकण्याचा आग्रह केला. खेळपट्टी संथ असल्यामुळे फलंदाजांना चेंडूंची प्रतीक्षा करून खेळण्याचा सल्ला दिला. आॅस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध केदार जाधव व कर्णधार उन्मुक्त चंद यांनी ५० पेक्षा जास्त
धावा केल्या; परंतु मयंक अग्रवाल, मनीष तिवारी आणि करुण नायर अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना कामगिरी उंचवावी लागेल.
रिजा हेंडरिक्स, डीन एगर, टी ब्रुईन आणि कोडी चेट्टी यांच्यामुळे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाची फलंदाजीची फळी मजबूत दिसत आहे. गोलंदाजीत त्यांच्याकडे लोंवाबो सोटसोबे, हार्डूस व्ही., बुरान हेंडरिक्स, वेन पर्नेल, एडी
ली, एगर यासारखे चांगले गोलंदाज आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: India will open the A 'wins' account?