भारत दौ-याआधी शहाणे व्हावे लागेल : कूक
By Admin | Updated: October 31, 2016 21:57 IST2016-10-31T21:56:50+5:302016-10-31T21:57:25+5:30
गलादेशविरुद्धच्या पराभवातून आम्हाला बोध घ्यावाच लागेल. भारत दौरा लगेचच सुरू होत आहे. आमच्या संघातील गुणवत्तेला अनुभवाची जोड आवश्यक असल्याने भारत दौरा सुरू होण्याआधी बरेच काही शिकावे लागेल

भारत दौ-याआधी शहाणे व्हावे लागेल : कूक
ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. 31 - बांगलादेशविरुद्धच्या पराभवातून आम्हाला बोध घ्यावाच लागेल. भारत दौरा लगेचच सुरू होत आहे. आमच्या संघातील गुणवत्तेला अनुभवाची जोड आवश्यक असल्याने भारत दौरा सुरू होण्याआधी बरेच काही शिकावे लागेल, असे
इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूक याने म्हटले आहे. बांगलादेशच्या फिरकी जोडीने आपल्याला सतावले. आता त्यापेक्षा सरस असणारे भारतीय फिरकी गोलंदाज जास्तच डोकेदुखी ठरतील, ही चिंता भेडसावत आहे. फिरकीस अनुकूल खेळपट्टीवर २७० धावांचे लक्ष्य सोपे नव्हते. चहापानानंतर आम्हाला फटका बसला. या वातावरणात खेळण्याचा अनुभव नसल्याने फटका बसत
आहे, असे कूकने सांगितले. कूक सहक-यांना या पराभवानंतर भारत दौºयासाठी तयार करीत होता. तो म्हणाला,
की उपखंडात फिरकीस अनुकूल खेळपट्ट्या आहेत, त्यात गैर काहीच नाही. आमच्याकडे कसोटी होतात, त्या वेळी हिरव्यागार खेळपट्ट्या असल्याबद्दल टीका होत असते. आम्ही त्या खेळपट्ट्यांवर क्रि केट शिकतो, तर बांगलादेशसारखे संघ फिरकीस अनुकूल असलेल्या खेळपट्ट्यांवर अधिक भर देतात. याबाबत लवकरात लवकर शिकावे लागेल. आमचा संघ गुणवान आहे. आम्ही यातून
योग्य त्या गोष्टी शिकलो तर संघास याचा फायदाच होईल. भारतात फिरकीसमोर खेळणे हे नेहमीच कठीण असते. या पार्श्वभूमीवर आम्ही दौ-याकडे अभ्यास दौरा म्हणून बघत होतो, असेही कूकने स्पष्ट केले.