भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी अनिर्णित

By Admin | Updated: November 18, 2015 12:20 IST2015-11-18T12:20:55+5:302015-11-18T12:20:55+5:30

बेंगळुरुत सुरु असलेली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी अखेर अनिर्णित अवस्थेत संपली. पावसामुळे पाचव्या दिवशीही खेळ होऊ शकला नाही व अखेरीस पंचांनी कसोटी अनिर्णित अवस्थेत संपल्याचे जाहीर केले.

India vs South Africa Test draw | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी अनिर्णित

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी अनिर्णित

ऑनलाइन लोकमत

बेंगळुरु, दि. १८ -  बेंगळुरुत सुरु असलेली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी अखेर अनिर्णित अवस्थेत संपली. पावसामुळे पाचव्या दिवशीही खेळ होऊ शकला नाही व अखेरीस पंचांनी कसोटी अनिर्णित अवस्थेत संपल्याचे जाहीर केले. 

बेंगळुरुत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सुरु होती. पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा डाव २१४ धावांवर आटोपला होता. तर भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावात बिनबाद ८० धावांची सलामी दिली होती. मात्र दुस-या दिवसापासून बेंगळुरुत दमदार पावसाने हजेरी लावल्याने कसोटी सामन्यावर पाणी फेरले.  आज बुधवारी पाचव्या दिवशीही खराब हवामान व ओल्या खेळपट्टीमुळे खेळ सुरु होऊ शकला नाही. या कसोटीत चार दिवस पावसामुळे वाया गेले. दुपारी लंचदरम्यान पंचांनी मैदानाचा आढावा घेतला व पाचव्या दिवसाचा खेळही रद्द करण्याचा निर्णय घेतला. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत १- ० ने आघाडीवर आहे. तिसरा कसोटी सामना नागपूरमध्ये रंगणार आहे. 

Web Title: India vs South Africa Test draw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.