सहागडी राखत भारताची लंकेवर मात, विजयाची हॅट्रीक
By Admin | Updated: November 9, 2014 21:41 IST2014-11-09T21:41:06+5:302014-11-09T21:41:06+5:30
भारत वि. श्रीलंकेतील आजचा तिसरा सामना भारताने सहागडी राखत जिंकला आहे. अजिंक्य रहाणे व शिखर धवन यांनी दमदार फलंदाजी करत लंकेच्या गोलंदाजांवर दडपण आणले.

सहागडी राखत भारताची लंकेवर मात, विजयाची हॅट्रीक
ऑनलाइन लोकमत
हैद्राबाद,दि. ९ - भारत वि. श्रीलंकेतील आजचा तिसरा सामना भारताने सहागडी राखत जिंकला आहे. अजिंक्य रहाणे व शिखर धवन यांनी दमदार फलंदाजी करत लंकेच्या गोलंदाजांवर दडपण आणले. १५ षटकांत भारताच्या ७६ धावा झाल्या असताना अजिंक्य रहाणे ३१ धावांवर थिसारा परेराच्या गोलंदाजीवर खेळत असताना जयवर्धनेकडे झेल गेल्याने बाद झाला. आठ चौकार व एक षटकार लगावत शिखर धवन धावांचे शिखर उभारेल असे वाटत असतानाच नुआन कुलासेकरा च्या गोलंदाजीवर संघकाराकडे झेल गेल्याने धवन ९१ धावांवर बाद झाला. अर्धशतक पू्र्णझाल्यावर काहिशा जोशातच विराटने दिलशानच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला असता लाहिरूकडे झेल गेल्याने विराटला तंबूत परतावे लागले. पाच षटकं आणि पाचचेंडू बाकी असताना भारताने लंकेचे आव्हान सहज संपुष्टात आणले. आणि विजयाची हॅट्रीक अबाधीत ठेवली. सुट्टीचा दिवस असल्याने हैद्राबादमधील राजीवगांधी स्टेडीयमवर हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट शौकीनांनी गर्दी केली होती.