नीरज चोप्रानं ज्या स्पर्धेत सुवर्ण जिंकून इतिहास रचला, त्याच स्पर्धेत आज भारताच्या रिले टीमनं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 12:22 PM2021-08-18T12:22:28+5:302021-08-18T12:22:52+5:30

२०१६मध्ये पोलंड येथे झालेल्या जागतिक २० वर्षांखालील अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्णपदकाची कमाई करून इतिहास रचला होता.

India U20 4x400 Mixed Relay Team finishes Heat-1 in the top with time of 3:23:36, qualifying for the finals at U20 World Championships  | नीरज चोप्रानं ज्या स्पर्धेत सुवर्ण जिंकून इतिहास रचला, त्याच स्पर्धेत आज भारताच्या रिले टीमनं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला, पण...

नीरज चोप्रानं ज्या स्पर्धेत सुवर्ण जिंकून इतिहास रचला, त्याच स्पर्धेत आज भारताच्या रिले टीमनं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला, पण...

Next

२०१६मध्ये पोलंड येथे झालेल्या जागतिक २० वर्षांखालील अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्णपदकाची कमाई करून इतिहास रचला होता. त्यानं ८६.४८ मीटर भालाफेक करून कनिष्ठ गटातील विश्ववक्रमाची नोंद केली होती. त्यानं ऑलिम्पिक पजक विजेत्या केशोर्न वॅलकॉट याचा २० वर्षांखालील स्पर्धेतील वर्ल्ड रेकॉर्ड मोडला होता. त्याच स्पर्धेत आज भारताच्या मिश्र रिले संघानं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला, परंतु काही मिनिटांतच तो मोडला गेला. 


आजपासून नैरोबी येथे सुरू झालेल्या जागतिक २० वर्षांखालील अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले संघानं हिट १ मध्ये विक्रमाची नोंद केली. त्यांनी ३ मिनिटे २३.३६ सेकंदाची वेळ नोंदवताना नायजेरियाचा ३ मिनिटे २४.३४ सेकंदांचा विक्रम मोडला. अब्दुल रझ्झाक, प्रिया मोहन, सम्मी आणि कपिल यांचा समावेश असलेल्या संघानं मारली अंतिम फेरीत धडक ( The Indian team (Abdul Razzaq, Priya Mohan, Summy & Kapil) tops the heats in the 4x400m mixed relay to reach the final #U20WorldChampionships) 

हिट २ मध्ये नायजेरियानं ३ मिनिटे २१. ६६ सेकंदाची वेळ नोंदवून वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला. झेक प्रजासत्ताकनं ३ मिनिटे २४.१५ सेकंदाची वेळ नोंदवली.

Web Title: India U20 4x400 Mixed Relay Team finishes Heat-1 in the top with time of 3:23:36, qualifying for the finals at U20 World Championships 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.