भारत अर्जेंटिना लढत आज

By Admin | Updated: October 14, 2015 00:03 IST2015-10-14T00:03:03+5:302015-10-14T00:03:03+5:30

गेल्या लढतीतील पराभव विसरून भारतीय ज्युनिअर हॉकी संघ पाचव्या सुलतान जोहोर कप स्पर्धेत बुधवारी अर्जेंटिनाविरुद्ध विजय मिळविण्यास प्रयत्नशील आहे

India today fight against Argentina | भारत अर्जेंटिना लढत आज

भारत अर्जेंटिना लढत आज

जोहोर बारू : गेल्या लढतीतील पराभव विसरून भारतीय ज्युनिअर हॉकी संघ पाचव्या सुलतान जोहोर कप स्पर्धेत बुधवारी अर्जेंटिनाविरुद्ध विजय मिळविण्यास प्रयत्नशील आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध ५-१ ने विजय मिळवीत स्पर्धेत शानदार सलामी दिली. दुसऱ्या लढतीत ब्रिटनविरुद्ध आक्रमक खेळ केला; पण प्रतिस्पर्धी संघाने दुसऱ्या हाफमध्ये चमकदार कामगिरी करीत भारतावर ४-३ ने विजय नोंदवला.
भारतीय संघ विजयी मार्गावर परतत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यास उत्सुक आहे. भारताने २०१३ मध्ये दोनदा अर्जेंटिनाचा पराभव केला होता. तिसऱ्या सुलतान जोहोर कप स्पर्धेत भारताने अर्जेंटिनाविरुद्ध ३-२ ने विजय मिळवला होता, तर त्यानंतर हीरो हॉकी ज्युनिअर विश्वकप स्पर्धेत ४-२ विजय साकारला होता. यापूर्वी २००१ मध्ये होबार्टमध्ये एफआयएच ज्युनिअर विश्वकप हॉकी स्पर्धेत भारताने अर्जेंटिनाचा ६-१ ने धुव्वा उडवीत जेतेपद पटकावले होते. भारताच्या आघाडीच्या फळीत सुमित कुमार, अरमान कुरेशी, अजय यादव आणि परविंदर सिंग यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता आॅस्ट्रेलियाचा १-० ने पराभव करीत स्पर्धेत विजयी सुरुवात करणारा अर्जेंटिना संघ कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे.
भारतीय प्रशिक्षक हरेंद्रसिंग म्हणाले, ‘भारतीय संघ अर्जेंटिनाच्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी करीत आहे. लढत रंगतदार होईल, अशी आशा आहे.
आम्ही यापूर्वीही अर्जेंटिनाविरुद्ध विजय मिळवला आहे. त्यांच्याविरुद्ध सर्वंच सामन्यांत सरशी साधली
आहे. गेल्या दोन्ही सामन्यांत
आमची कामगिरी उल्लेखनीय
ठरली आहे.
आम्हाला बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयाची आशा आहे.’ (वृत्तसंस्था)

Web Title: India today fight against Argentina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.