चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर
By Admin | Updated: May 18, 2016 06:07 IST2016-05-18T06:07:09+5:302016-05-18T06:07:09+5:30
लंडनमध्ये होणाऱ्या एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १८ सदस्यांच्या भारतीय हॉकी संघातून विश्रांती देण्यात आली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर
नवी दिल्ली : कर्णधार सरदार सिंग आणि अव्वल ड्रॅग फ्लिकर रुपदिंर पालसिंग यांना १० ते १७ जून या कालावधीत लंडनमध्ये होणाऱ्या एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १८ सदस्यांच्या भारतीय हॉकी संघातून विश्रांती देण्यात आली आहे. कर्णधारपदाची जबाबदारी गोलकीपर पी.आर. श्रीजेशवर सोपविण्यात आली आहे. या व्यतिरिक्त हॉकी इंडियाने स्ट्रायकर रमणदीप सिंग आणि डिफेंडर जसजीत सिंग कुलार यांनाही विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रिओ आॅलिम्पिकपूर्वी भारताची ही दुसरी अंतिम स्पर्धा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर भारतीय संघ वलेंसिया येथे सहा देशांचा समावेश असलेल्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. आॅलिम्पिकपूर्वी भारतासाठी ही अखेरची स्पर्धा राहील.
एस.व्ही. सुनील संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. (वृत्तसंस्था)
>भारतीय संघ
श्रीजेश (कर्णधार), विकास दहिया, प्रदीप मोर, व्ही.आर. रघुनाथ, कोथाजित सिंग, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंग, दानिश मुज्तबा, चिंगलेनसाना सिंग, मनप्रीत सिंग, एस.के. उथप्पा, देविंदर वाल्मिकी, हरजिंत सिंग, तलविंदर सिंग, मंदीप सिंग, एस. व्ही. सुनील (उपकर्णधार), आकाशदीप सिंग, निकित थिमय्या.