भारत उपांत्य फेरीत
By Admin | Updated: December 28, 2015 03:28 IST2015-12-28T03:28:04+5:302015-12-28T03:28:04+5:30
युवा फुटबॉलपटू लल्लियनजुआला छांगते याने केलेल्या दोन शानदार गोलच्या बळावर सहा वेळेसच्या चॅम्पियन भारतीय संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना

भारत उपांत्य फेरीत
तिरुवनंतपूरम : युवा फुटबॉलपटू लल्लियनजुआला छांगते याने केलेल्या दोन शानदार गोलच्या बळावर सहा वेळेसच्या चॅम्पियन भारतीय संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपच्या अ गटाच्या लढतीत रविवारी नेपाळचा ४-१ गोलने धुव्वा उडवताना उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
केरळच्या त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या लढतीत छांगते याने त्याच्या नावावर एक अनोखा विक्रमही नोंदवला. तो देशाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळताना दोन गोल करणारा सर्वात कमी
वयाचा फुटबॉलपटूदेखील बनला.
१८ वर्षीय छांगते याने या सामन्यात दोन गोल केले. त्याआधी बाइचुंग भुतिया याने राष्ट्रीय संघाकडून खेळताना १९ वर्षांचा असताना त्याचा पहिला गोल केला.
भारताने स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला, तर नेपाळला
सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली. यजमान
संघाचे दोन सामन्यातील विजयाने ६ गुण झाले असून ते अ गटात अव्वलस्थानी आहेत.