ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी भारत सज्ज
By Admin | Updated: October 31, 2014 00:52 IST2014-10-31T00:52:03+5:302014-10-31T00:52:03+5:30
भारताचा पुरुष हॉकी संघ 1क् नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात होणा:या मालिकेत यजमान संघाचा सामना करण्यासाठी सज्ज आह़े

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी भारत सज्ज
नवी दिल्ली : भारताचा पुरुष हॉकी संघ 1क् नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात होणा:या मालिकेत यजमान संघाचा सामना करण्यासाठी सज्ज आह़े या दौ:यात भारतीय संघ चार कसोटी सामन्यांच्या सिरीजमध्ये नशीब अजमावणार आह़े
याच दौ:यात भारतीय संघाची 14 डिसेंबरपासून होणा:या चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारीसुद्धा होणार आह़े आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेता भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आह़े भारतीय संघ सरदार सिंहच्या नेतृत्वाखाली आपले चारही सामने पर्थ हॉकी मैदानावर खेळणार आह़े
या सिरीजसाठी रवाना होण्यापूर्वी सरदार म्हणाला की, आम्ही या मालिकेसाठी गत काही आठवडय़ांपासून विशेष मेहनत घेतली आह़े विशेष म्हणजे आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आह़े याच बळावर मालिकेत यजमान संघावर वर्चस्व राखू, असा विश्वास आह़े (वृत्तसंस्था)
भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पी़आऱ श्रीजेश म्हणाला की, या सिरीजमध्ये आमचे लक्ष्य सवरेत्कृष्ट कामगिरी करणो हे आह़े आशियाई स्पर्धेत ज्या प्रकारे संघ एकजुटीने खेळला त्याच पद्धतीने आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळ करणार आहोत. त्यामुळे या मालिकेत यजमान संघावर सरशी साधण्याचा प्रयत्न करू.