जपानविरुध्द भारत करणार हॉकी वर्ल्ड लीगची तयारी
By Admin | Updated: May 2, 2015 23:47 IST2015-05-02T23:47:29+5:302015-05-02T23:47:29+5:30
येथील कलिंगा स्टेडीयममध्ये जपानविरुध्द होणाऱ्या चार सामन्यांच्या मालिकेतून भारतीय संघ एफआयएच हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनलची तयारी करणार आहे.

जपानविरुध्द भारत करणार हॉकी वर्ल्ड लीगची तयारी
भुवनेश्वर : येथील कलिंगा स्टेडीयममध्ये जपानविरुध्द होणाऱ्या चार सामन्यांच्या मालिकेतून भारतीय संघ एफआयएच हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनलची तयारी करणार आहे.
भारतीय संघ सध्या चांगल्या लयीत असून हा फॉर्म कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. गेल्या महिन्यात मलेशियातील इपोह येथे झालेल्या २४ व्या अझलन शाह चषक स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले होते. वर्ल्ड रँकिंगमध्येही भारत मजबूत दिसत आहे. भारत सध्या नवव्या तर जपान १६ व्या स्थानावर आहे. भारताचे मुख्य कोच पॉल वॉन यांच्याकडे सध्या २४ जणांचा संघ उपलब्ध असून या मालिकेत ते नवनवीन प्रयोग, आणि धोरणे अजमावू शकतात.
गेल्यावेळी या दोन संघात शेवटची लढत २0१३ ला एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झाला होता. जपानमध्ये झालेल्या या लढतीत भारताला 0-२ असे पराभूत व्हावे लागले होते.