भारत-पाकिस्तान ‘उपांत्य’ थरार आज

By Admin | Updated: December 12, 2014 23:50 IST2014-12-12T23:49:59+5:302014-12-12T23:50:47+5:30

चॅम्पियन पाकिस्तानविरुद्ध शनिवारी दोन हात करेल तेव्हा प्रथमच फायनलमध्ये पोहोचण्यासाठी एशियाडमधील यशाची पुनरावृत्ती करण्याच्या वज्र निर्धाराने मैदानात पाऊल ठेवेल.

India-Pakistan 'Semi-Thaar' Tharar Today | भारत-पाकिस्तान ‘उपांत्य’ थरार आज

भारत-पाकिस्तान ‘उपांत्य’ थरार आज

चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल : टीम इंडिया एशियाडमधील कामगिरीची पुनरावृत्ती करणार?
भुवनेश्वर : एशियाडमध्ये गोल्डन कामगिरी करणारा आणि सध्या जबरदस्त सूर गवसलेला भारतीय संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी व तीन वेळेसचा चॅम्पियन पाकिस्तानविरुद्ध शनिवारी दोन हात करेल तेव्हा प्रथमच फायनलमध्ये पोहोचण्यासाठी एशियाडमधील यशाची पुनरावृत्ती करण्याच्या वज्र निर्धाराने मैदानात पाऊल ठेवेल.
इंचिओन आशियाई स्पर्धेत भारताने फायनलमध्ये पाकिस्तानला धूळ चारली होती. त्यामुळे या कामगिरीची पुनरावृत्ती करून चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजेतेपदाचा दुष्काळ संपविण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. सुरुवातीला सामने गमावल्यानंतरही त्यांनी उपांत्य फेरीत हॉलंडचा 4-2ने पराभव करून  सेमीफायनलचे तिकीट निश्चित केले.
दुसरीकडे, भारताने शनिवारी पाकिस्तानला धूळ चारली, तर ते प्रथमच या स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरतील आणि त्यांच्याजवळ प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावण्याची संधीदेखील असेल. कर्णधार सरदारसिंग याशिवाय ड्रॅग फ्लिकर रूपिंदर पालसिंह, एस. उथप्पा, आकाशदीपसिंग, धर्मवीरसिंग आणि रघुनाथ हे टीम इंडियातील सर्वात महत्त्वाचे खेळाडू आहेत.(वृत्तसंस्था)
 
च्चॅम्पियन्स ट्रॉफीचा रेकॉर्ड पाहता, भारत आणि पाकिस्तान तिस:या 
व चौथ्या क्रमांकांसाठी 5 वेळा आमनेसामने उभे ठाकले आहेत. 1982मध्ये फक्त भारत तिस:या स्थानी राहिला, तर पाकिस्तानला चौथ्या क्रमांकावर समाधान 
मानावे लागले. 
 
भारतीय संघाला आता अनेक विभागांत सुधारणा करण्याची गरज आहे व त्याची आम्हाला जाणीव आहे. पाकविरुद्ध आम्हाला आपल्या व्यूहरचनेवर विचार करावा लागेल. हा संघ तुल्यबळ असून त्याला कमी लेखू शकत नाही व कोणताही ढिलेपणा केले जाऊ शकत नाही.
- सरदार सिंग
 
भारताविरुद्धचा सामना आव्हानात्मक होईल मोहंमद इरफान, मोहंमद इम्रान, मोहंमद उमर भुट्टा भारतासाठी अडचणी निर्माण करू शकतात. याशिवाय, पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्याच्या कलेत पाकिस्तानी खेळाडू वाकबगार आहेत. 
- शहनाझ शेख, 
पाकिस्तानचे प्रशिक्षक 
 
पाकिस्तान भारताविरुद्ध 9-11 व्यूहरचनेने खेळणार
च्चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला पराभूत करण्याच्या प्रयत्नात गुंतलेला पाकिस्तानी हॉकी संघ उद्या कलिंगा स्टेडियमवर होणा:या लढतीत 9-11 ने खेळण्याची व्यूहरचना आखत आहे. पाकिस्तानी प्रशिक्षक शहनाज शेख यांनीदेखील आम्ही भारताविरुद्ध शनिवारी 9-11 या व्यूहरचनेनुसार खेळणार असल्याचे स्पष्ट केले.
च्9-11 न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात हा आकडा आठवणीत केला जातो. 11 सप्टेंबर 2001 मध्ये दहशतवादी संघटना अल् कायदाने अमेरिकेच्या न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनवर चार हल्ले केले होते. त्यात 2996 व्यक्ती मारले गेले होते.
ऑस्ट्रेलिया-जर्मनीत दुसरी सेमीफायनल
च्सलग पाच वेळेस आणि एकूण 13 वेळेस चॅम्पियन राहिलेला ऑस्ट्रेलिया शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या दुस:या उपांत्य फेरीत जर्मनीच्या युवा संघाशी दोन हात करेल. गतचॅम्पियन ऑस्ट्रेलियाने स्पर्धेत निराशाजनक सुरुवात केली होती आणि सलामीच्या सामन्यात त्यांना इंग्लंडकडून पराभव करावा लागला होता. त्यानंतर बेल्जियमविरुद्ध 
1-1 असा ड्रॉ राहिला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने मुसंडी मारताना विश्वचषक कांस्यपदक विजेत्या अर्जेटिनाविरुद्ध 4-2 असा शानदार 
विजय मिळवला होता. 

 

Web Title: India-Pakistan 'Semi-Thaar' Tharar Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.