भारत जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर
By Admin | Updated: April 10, 2015 08:39 IST2015-04-09T01:24:40+5:302015-04-10T08:39:04+5:30
बचाव फळीच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला बुधवारी अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत मलेशियाविरुद्ध २-३ ने पराभव स्वीकारावा लागला.

भारत जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर
पणजी : ‘फॅबइंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रता दत्ता आणि व्यवस्थापकीय संचालक विल्यम बिसेल शुक्रवारी जबानी देण्यासाठी सीआयडी गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहतील. या दोघांनी तसे कळविले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिली.
पोलिसांनी कंपनीच्या संचालकांनाही समन्स काढले असून ते गुरुवारी (दि.९) हजर राहण्याची शक्यता आहे. ज्या चार कर्मचाऱ्यांना प्रारंभीच अटक केली व नंतर जामिनावर सुटका झाली त्यांच्यापैकी काहींना बुधवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले. शोरुमच्या व्यवस्थापिका चैत्राली सावंत यांची मंगळवारी जबानी घेण्यात आली होती.
कांदोळी येथील फॅबच्या शोरुममध्ये छुप्या कॅमेऱ्याव्दारे चेंजिंग रुममधील चित्रण केले जात असल्याचे खळबळजनक प्रकरण गेल्या आठवड्यात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी उघडकीस आणले होते. या प्रकरणी पोलिसांनी भादंसंच्या कलम ३५४ क, ५0९ तसेच आयटी कायद्याच्या कलम ६६ ई खाली गुन्हे नोंद केले आहेत.
दरम्यान, या प्रकरणामुळे देशभरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसंदर्भात उलटसुलट खूप चर्चा झाली़ काही ठिकाणी अशी आस्थापने तपासण्याचाही निर्णय झाला़ (प्रतिनिधी)