हॉकी वर्ल्डकप मधून भारत बाहेर

By Admin | Updated: June 9, 2014 19:34 IST2014-06-09T19:34:36+5:302014-06-09T19:34:36+5:30

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप हॉकी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारूण पराभव केला. खेळाच्या पहिल्याच भागात ऑस्ट्रेलियन संघाने चार गोल केले.

India out of hockey World Cup | हॉकी वर्ल्डकप मधून भारत बाहेर

हॉकी वर्ल्डकप मधून भारत बाहेर

ऑनलाइन टीम
हेग (ऑस्ट्रेलिया), दि. ९ - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप हॉकी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारूण पराभव केला. खेळाच्या पहिल्याच भागात ऑस्ट्रेलियन संघाने चार गोल केले. भारताने दुस-या भागात ठिक खेळी केली असली तरीही भारतीय संघ खाते उघडण्यास असफल ठरला. झालेवस्की व वेहटोन यानी संधी उपलब्ध करून देताच गोव्हरने क्षणाचाही विलंब नकरता पहिला गोल केला. १६ व्या मिनीटाला क्रिस सिरिएलो याला पॅनलटी लागू झाली त्यावेळीही भारत ०-२ अशा फरकाने खेळत होता. २० व्या मिनिटात जर्मि हेवार्डने गोल केला, तर फक्त दोन मिनिटांच्या फरकाने सिरीएलोने चौथा गोल केला. त्याचक्षणी ऑस्ट्रेलिया आज सामना जिकणार असल्याची रसिकांना खात्री पटली. हा सामना जिंकत ऑस्ट्रलियाने उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे

Web Title: India out of hockey World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.