भारत-न्यूझीलंड संघ आज नागपुरात

By Admin | Updated: March 13, 2016 04:14 IST2016-03-13T04:14:49+5:302016-03-13T04:14:49+5:30

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टी-२० विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात असलेला भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध सलामीचा सामना खेळण्यासाठी आज रविवारी नागपुरात दाखल होत आहे

India-New Zealand team today in Nagpur | भारत-न्यूझीलंड संघ आज नागपुरात

भारत-न्यूझीलंड संघ आज नागपुरात

नागपूर : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टी-२० विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात असलेला भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध सलामीचा सामना खेळण्यासाठी आज रविवारी नागपुरात दाखल होत आहे. न्यूझीलंडचेदेखील आजच आगमन होईल.
विश्वचषकातील भारत-न्यूझीलंड हा सामना व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये मंगळवारी (दि.१५) सायंकाळी ७.३० पासून खेळला जाईल. त्यासाठी भारतीय संघाचे आज सकाळी १०.५ वाजता मुंबईहून चार्टर्ड विमानाने आगमन होईल. न्यूझीलंड संघ दुपारी ४.३० च्या सुमारास नागपुरात दाखल होईल. भारतीय संघाचे वास्तव्य वर्धा मार्गावरील हॉटेल ‘ली मेरिडियन’ येथे असेल.
न्यूझीलंड संघ हॉटेल ‘रॅडिसन ब्ल्यू’ येथे वास्तव्य करणार आहे.
दोन्ही संघ आज सराव करणार
नाहीत. भारतीय संघ सोमवारी
सकाळी १० वाजेपासून जामठा मैदानावर सराव करेल. त्यानंतर दुपारी ३ वाजेपासून पाहुण्या संघाचा सराव होईल, अशी माहिती व्हीसीएच्या सूत्रांनी दिली.
(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: India-New Zealand team today in Nagpur