भारत-न्यूझीलंड ‘फायनल’ची भविष्यवाणी !

By Admin | Updated: March 1, 2015 01:16 IST2015-03-01T01:16:19+5:302015-03-01T01:16:19+5:30

आॅकलंडमध्ये दोन यजमान आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड मधील सामन्याबाबतच्या उत्साहाला उधाण आले होते. उभय देशांदरम्यान क्रिकेटमध्ये पारंपरिक स्पर्धा राहिली आहे.

India-New Zealand 'final' prediction! | भारत-न्यूझीलंड ‘फायनल’ची भविष्यवाणी !

भारत-न्यूझीलंड ‘फायनल’ची भविष्यवाणी !

आॅकलंडमध्ये दोन यजमान आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड मधील सामन्याबाबतच्या उत्साहाला उधाण आले होते. उभय देशांदरम्यान क्रिकेटमध्ये पारंपरिक स्पर्धा राहिली आहे. सामन्याच्या आधी लोकांमध्ये चालणाऱ्या चर्चेमध्ये याची झलक दिसली. प्रत्येकाच्या ओठावर सामन्याची चर्चा तर होतीच, पण आश्चर्य असे की भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनलची भविष्यवाणीदेखील अनेकजण करताना दिसले.
पब असो, दुकान किंवा बार, अशी सर्वत्र आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामन्याबद्दल चर्चा चालली. वेटर असेल किंवा टॅक्सीचालक असेल, सर्वच जण या सामन्याबद्दल बोलत होते. उभय देशांमधील चाहत्यांसाठी हा ‘महासंग्राम’ होता. सामना सुरू होताच उभय संघांतील चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले. दोन्हीकडील चाहत्यांनी संघाला प्रोत्साहन देण्यात कुठलीही कसर शिल्लक राखली नाही.
क्वीन्सटाऊनमधून आॅकलंडमध्ये आलेल्या एका चाहत्याशी येथे गाठ पडली; पण तो स्टेडियममध्ये पोहोचू शकला नव्हता. न्यूझीलंडमध्ये ब्रेंडन मॅक्युलम सर्वांचा आवडता आहे. त्याच्या आक्रमक खेळाच्या बळावर न्यूझीलंडने आॅस्ट्रेलियाविरुद्ध रोमहर्षक विजय नोंदविला. न्यूझीलंड एका गड्याने जिंकला, पण या विजयाचा उत्साह इतका मोठा होता की, हा विजय मोठ्या फरकाने साजरा झाला असे वाटत होते. या सामन्याद्वारे एक सिद्ध झाले की, ‘कमी धावसंख्येचे सामनेदेखील चाहत्यांचा श्वास रोखून धरू शकतात.’
न्यूझीलंडचे चाहते आपल्या संघाला विश्वचषकात सर्वोत्तम मानतात. हे चाहते फारच सकारात्मक आहेत. आश्चर्यकारकरीत्या त्यांनी भारत-न्यूझीलंडदरम्यान फायनल होण्याची भविष्यवाणी केली. भारताने सलग तिसऱ्या विजयासह ‘ब’ गटात अव्वल स्थान काबीज केले. शिवाय न्यूझीलंडसोबत विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा संयुक्तपणे पहिला देश होण्याचा मान मिळविला. यामुळे कदाचित भारत-न्यूझीलंड यांच्यात फायनल खेळले जाईल, या चर्चेला ऊत आला असावा.

वास्तव्यासाठी हॉटेलसह अपार्टमेंट!
आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड लढतीचे साक्षीदार होण्यासाठी आॅकलंडमध्ये दूरदुरून क्रिकेट चाहते आले होते. त्यांच्या वास्तव्यासाठी हॉटेलसह अपार्टमेंट उपलब्ध होते. पर्यटक येथे हॉटेलशिवाय अपार्टमेंटदेखील भाड्याने घेऊ शकतात. समूहाने आलेली मंडळी दोन- दोन बेडरूम असलेले अपार्टमेंट घेतात, तर दोन व्यक्ती असल्यास एखाद्या घरात खोली घेतात. एखाद्या घरात तीन बेडरूम असतील तर घरमालक एक बेडरूम वापरतो. उर्वरित दोन बेडरूम पर्यटकांना भाड्याने दिल्या जातात. पर्यटक कितीही दिवस वास्तव्य करूशकतात. हॉटेलच्या तुलनेत अपार्टमेंट किंवा घरची खोली स्वस्त दरात उपलब्ध होते.

Web Title: India-New Zealand 'final' prediction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.