भारताने अव्वल स्थान गमाविले
By Admin | Updated: October 14, 2014 00:35 IST2014-10-14T00:35:23+5:302014-10-14T00:35:23+5:30
भारताची आयसीसी वन-डे रॅन्किंगमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकाविण्याची शक्यता मावळली आहे.

भारताने अव्वल स्थान गमाविले
दुबई : ‘हुडहुड’ वादळाच्या पाश्र्वभूमीवर वेस्ट इंडीजविरुद्ध विशाखापट्टणम येथे होणार तिसरा वन-डे सामना रद्द करण्यात आल्यामुळे भारताची आयसीसी वन-डे रॅन्किंगमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकाविण्याची शक्यता मावळली आहे. ऑस्ट्रेलियाने रॅन्किंगमध्ये अव्वल स्थान पटकाविले आहे.
आयसीसीने स्पष्ट केले की, ‘संयुक्त अरब अमिरातमध्ये
खेळल्या गेलेल्या वन-डे मालिकेत पाकिस्तानचा 3-क् ने सफाया केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ रिलायन्स आयसीसी वन-डे आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर
आला आहे.’ अबुधाबीमध्ये रविवारी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध एका धावेने विजय मिळविला तर हुडहुड वादळामुळे भारत-विंडीज संघांदरम्यानची तिसरी लढत रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान निश्चित केले आहे.
4महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा क्.क्2 मानांकन गुणाने पिछाडीवर राहणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ 114 मानांकन गुणांसह अव्वल स्थानावर आहे.