अखेरच्या क्षणी भारत पराभूत

By Admin | Updated: December 7, 2014 01:20 IST2014-12-07T01:20:15+5:302014-12-07T01:20:15+5:30

ऑलिम्पिक चॅम्पियन जर्मनीने अखेरच्या काही सेकंदांत गोल नोंदवीत शनिवारी चॅम्पियन्स हॉकीच्या सलामीच्या सामन्यात यजमान भारताला 1-0 ने धूळ चारली.

India lost at the last moment | अखेरच्या क्षणी भारत पराभूत

अखेरच्या क्षणी भारत पराभूत

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : जर्मनीचा 1-0 ने विजय
भुवनेश्वर : गोलकीपर पी. आर. श्रीजेशच्या जोरकस प्रयत्नानंतरही ऑलिम्पिक चॅम्पियन जर्मनीने अखेरच्या काही सेकंदांत गोल नोंदवीत शनिवारी चॅम्पियन्स हॉकीच्या सलामीच्या सामन्यात यजमान भारताला 1-0 ने धूळ चारली.
केरळच्या या गोलकीपरने जर्मनीचे अनेक हल्ले शिताफीने परतवून लावले. तो नसता तर ‘ब’ गटाच्या या सामन्यात जर्मनी मोठय़ा फरकाने विजयी झाला असता. अखेरच्या मिनिटाला त्याची चूक नडल्याने फ्लोरियन फुश याने गोल केला. फुशला रोखण्यासाठी श्रीजेश पुढे आला, पण चुकीच्या वेळी सूर मारला. दुसरीकडे संयम राखून जर्मनीच्या स्ट्रायकरने सामना संपायच्या 34 सेकंद आधी चेंडू गोलजाळीत ढकलला. सामन्यात जर्मनीने भारतावर सुरुवातीपासून वर्चस्व गाजविले. पहिल्या क्वॉर्टरमध्ये भारतीय बचावफळीने जर्मनीचे हल्ले बोथट ठरविले. पण अखेरच्या मिनिटाला गोल होताच श्रीजेशच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. जर्मनीला सुरुवातीच्या 1क् मिनिटांत दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. दुस:या क्वॉर्टरमध्येही श्रीजेशने दोनवेळा प्रतिस्पर्धी हल्ले शिताफीने परतविले. त्याच वेळी सरदारासिंग याला धर्मवीरच्या पासवर गोल नोंदविण्याची संधी मिळाली. पण सरदारा चुकल्याने ही संधी व्यर्थ ठरली. आकाशदीपसिंग याला एस. व्ही. सुनीलने उजव्या कोप:यातून पास दिला, पण तो देखील अपयशी ठरला. दरम्यान, विश्व क्रमवारीत दुस:या स्थानावर असलेल्या हॉलंडने अर्जेटिनाचा 3-क् ने पराभव केला. 
बेल्जियमने पाकिस्तानला बदडले
दुस:या लढतीत बेल्जियम संघाने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. बेल्जियमतर्फे 1क् व्या मिनिटाला टँगाय कोसिंगने गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले. दुस:या क्वार्टरमध्ये उभय संघांना गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. तिस:या क्वार्टरमध्ये पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद इम्रानने पेनल्टी स्ट्रोकवर गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर 7 मिनिटांनी थॉमस ब्रियेल्सने गोल नोंदवीत बेल्जियमला पुन्हा विजयी आघाडी मिळवून दिली. (वृत्तसंस्था)
 
इंग्लंडने विश्वचॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा शनिवारी 3-1 ने पराभव करीत आजपासून प्रारंभ झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत विजयी सलामी दिली. गतविजेता ऑस्ट्रेलियाला आज लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. इंग्लंडने या लढतीत चारही क्वार्टरमध्ये वर्चस्व गाजविले. इंग्लंडतर्फे सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये अॅलेस्टेयर ब्रागडोनने सहाव्या मिनिटाला पहिला गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर दुस:या क्वार्टरमध्ये सॅम्युल वार्डने 27 व्या मिनिटाला संघातर्फे दुसरा गोल नोंदविला. सामन्याच्या चौथ्या क्वार्टरमध्ये 56 व्या मिनिटाला सॅम्युल वार्डने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवीत संघाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. 
 
जर्मनी विजयी : भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताचा रमणदीप सिंग आणि जर्मनीचा मथिस मुलर यांच्यात चेंडवर ताबा मिळविण्यासाठी सुरू असलेली धडपड. सामना संपण्यास 
4क् सेकंद शिल्लक असताना जर्मनीने गोल केल्यामुळे या सामन्यात त्यांना भारतावर विजय मिळविता आला.

 

Web Title: India lost at the last moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.