शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

भारत चेक गणराज्यकडून पराभूत

By admin | Updated: September 20, 2015 23:53 IST

युकी भांबरीची जादूदेखील चालू शकली नाही आणि अनेकदा मिळालेली संधी गमावल्यामुळे तो जागतिक क्रमवारीतील ४० व्या क्रमांकावर असणाऱ्या जेरी वेस्लीकडून पराभूत झाला.

डेव्हिस कप : एशिया-ओशियाना झोनमध्येच राहणार भारतनवी दिल्ली : युकी भांबरीची जादूदेखील चालू शकली नाही आणि अनेकदा मिळालेली संधी गमावल्यामुळे तो जागतिक क्रमवारीतील ४० व्या क्रमांकावर असणाऱ्या जेरी वेस्लीकडून पराभूत झाला. त्यामुळे डेव्हिस कप विश्व ग्रुप प्लेआॅफ लढतीत भारताला अव्वल मानांकित चेक गणराज्यकडून १-३ अशा पराभवाचा सामना करावा लागला.युकीला चौथ्या सामन्यात आज येथे वेस्लीकडून ३-६, ५-७, २-६ असा दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताला पुढील वर्षाच्या स्पर्धेसाठी एशिया-ओशियाना ग्रुप एकमध्येच राहावे लागणार आहे, तसेच अव्वल मानांकित आणि तीन वेळेसचा चॅम्पियन चेक गणराज्यने १६ देशांच्या एलिट विश्व ग्रुपमध्ये पुन्हा स्थान मिळवले.भारताला आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी युकीचा सामना जिंकणे आवश्यक होते; परंतु दिल्लीचा हा २३ वर्षीय खेळाडू जिगरबाज खेळ करू शकला नाही आणि वेस्लीकडून तो सहजपणे पराभूत झाला.न्यूझीलंडमध्ये जुलै महिन्यात सुरेख कामगिरी करणाऱ्या युकीने येथे आपले दोन्हीही सामने गमावले. त्याने न्यूझीलंडमधील दोन्ही सामने जिंकले होते. ज्यात निर्णायक पाचवा सामना होता. त्यामुळे भारत प्लेआॅफमध्ये पोहोचला होता. लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा या जोडीच्या दुहेरीतील पराभवाने भारताच्या शक्यतेला जोरदार धक्का बसला होता. या सामन्याचा निकाल लागला होता. त्यामुळे दोन्ही संघांनी सोमदेव देववर्मन आणि लुकास रोसोल यांच्यातील औपचारिक सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. भारत मार्च २०११ नंतर प्रथमच विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात होता. तेव्हा भारत पहिल्याच फेरीत सर्बियाकडून १-४ असा पराभूत झाला होता.पहिला सेट गमावल्यानंतर युकीला दुसऱ्या सेटमध्ये वेस्लीची सर्व्हिस भेदण्याची पाच वेळेस संधी मिळाली; परंतु त्यातील एकाही संधीचा लाभ तो घेऊ शकला नाही. आठव्या गेममध्ये मिळालेल्या तीन संधींपैकी तो एकदाही गुण मिळवू शकला नाही आणि हीच बाब त्याच्या पराभवास कारणीभूत ठरली. २ तास १४ मिनिटे रंगलेल्या लढतीत जोरदार सर्व्हिस करणाऱ्या वेस्ली यानेच पूर्ण वर्चस्व राखले. (वृत्तसंस्था)