चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी सामन्यात भारत पराभूत

By Admin | Updated: December 13, 2014 21:19 IST2014-12-13T21:19:01+5:302014-12-13T21:19:01+5:30

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या सेमिफायनलच्या सामन्यात अटितटीच्या लढतीत पाकिस्तान संघाने भारताचा ४-३ असा पराभव केला.

India lose in Champions Trophy hockey match | चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी सामन्यात भारत पराभूत

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी सामन्यात भारत पराभूत

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १३ - चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या सेमिफायनलच्या सामन्यात अटितटीच्या लढतीत पाकिस्तान संघाने भारताचा ४-३ असा पराभव केला. पाकिस्तानचा संघ या विजयाबरोबरच फायनलमध्ये पोहोचला असून पाकिस्तान संघाची लढत आता जर्मनीबरोबर होईल. 
भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात शेवटपर्यंत भारताने आपल्या अशा जिवंत ठेवल्या होत्या. पाकिस्तानने २-१ अशी आघाडी घेतल्यावर भारताने लगेच गोल करीत बरोबरी साधली. त्यानंतर २-२,३-३, अशी बरोबरी साधून भारताने पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर दिले मात्र शेवटच्या काही मिनिटात पाकिस्तानच्या कादीरने चौथा गोल करीत संघाला ४-३ असा विजय मिळवून दिला. अंतिम सामन्यात पाकिस्तानची लढत आता जर्मनीबरोबर पाहायला मिळणार आहे. 

 

Web Title: India lose in Champions Trophy hockey match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.