भारताकडे १५ धावांची आघाडी
By Admin | Updated: July 3, 2014 04:43 IST2014-07-03T04:43:30+5:302014-07-03T04:43:30+5:30
डर्बिशायरच्या पहिल्या डावातील पाच बाद ३२६ (डाव घोषित) धावांना उत्तर देणाऱ्या भारताने सावध सुरुवात केली.

भारताकडे १५ धावांची आघाडी
डर्बी : डर्बिशायरच्या पहिल्या डावातील पाच बाद ३२६ (डाव घोषित) धावांना उत्तर देणाऱ्या भारताने सावध सुरुवात केली. तीन दिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ६ बाद ३४१ धावांवर डाव घोषित करून १५ धावांची आघडी घेतली. चेतेश्वर पुजारा आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी प्रत्येकी ८१ धावांचे योगदान दिले.
यजमान संघाने ३२६ धावांवर डाव घोषित केल्यानंतर भारताने दोन्ही सलामीवीर झटपट गमावले. शिखर धवन (६) आणि मुरली विजय (६) हे फार काळ स्थिरावू शकले नाहीत. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी संघाला सावरले. या दोघांनी संघाला शतकाच्या उंबरठ्यावर आणले. ३६ धावांवर कोहली माघारी परतल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने पुजाराला दमदार साथ दिली. कोहली ३६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर धोनी व पुजारा या जोडीने ११९ धावांची भागीदारी केली. त्यांच्या या दमदार खेळाने भारताने मुसंडी मारली. २ बाद १८ अशा दयनीय अवस्थेतून भारत ४ बाद २०० अशा मजबूत स्थितीत आला. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या धोनीला ४६ धावांवर वेनराईटने माघारी धाडले. त्यानंतर रविंद्र जाडेजाही ४५ धावांचे योगदान देऊन तंबूत परतला. स्टुअर्ट बिन्नी आणि पुजारा यांनी संघाला आघाडी मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. दोघांनीही संयमी खेळ करत प्रत्येकी ८१ धावांची खेळी केली.दिवसअखेर भारताने ३४१ धावा केल्या.