भारत अजिंक्यच..!

By Admin | Updated: March 16, 2015 23:58 IST2015-03-16T23:58:31+5:302015-03-16T23:58:31+5:30

भारतीय संघ एका चॅम्पियन प्रमाणे या सामन्यात लढला आणि पाकिस्तानवर विश्वचषक स्पर्धेत विजयाचा षटकार ठोकला.

India invincible ..! | भारत अजिंक्यच..!

भारत अजिंक्यच..!

पाकविरुद्ध वर्ल्डकपमधील सहावा विजय
भारत : पाकिस्तान सामना आणि तोही विश्वचषकात म्हणजे चाहत्यांसाठी दुहेरी पर्वणी. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान एकदाही भारताला हरवू शकलेला नाही, हा इतिहास असला तरी तिरंगी मालिकेतील आणि त्यापूर्वीच्या कसोटी मालिकेतील खराब कामगिरीमुळे भारतीय चाहत्यांच्या मनात कुठंतरी पाल चुकचुकत होती. पण सगळ्या शंका-कुशंकांचा कडेलोट करीत भारतीय संघ एका चॅम्पियन प्रमाणे या सामन्यात लढला आणि पाकिस्तानवर विश्वचषक स्पर्धेत विजयाचा षटकार ठोकला. या विजयाने भारतीय चाहत्यांनी प्रचंड जल्लोष केला तर आजपर्यंत जे घडले नाही ते यावेळी घडणार, अशी आस ठेवून असणाऱ्या पाकिस्तानी चाहत्यांच्या पदरी या निकालामुळे पुन्हा एकदा निराशा पडली.

मॅच पॉर्इंट
नाणेफेकीचा निर्णय : धोनीने विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय निर्णायक ठरला. अ‍ॅडीलेडमध्ये धावांचा पाठलाग करताना पाक ७ वेळा हरला आहे, हा इतिहासही या निर्णयामागे असावा.
विराट-शिखरची पायाभरणी : सलामीवीर रोहित शर्मा (१५) बाद झाल्यानंतर शिखर-विराट या दिल्लीकर जोडीने अत्यंत संयमी आणि तितक्याच जबाबदारीने खेळ करीत दुसऱ्या विकेटसाठी त्यांनी १२९ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी पाकसाठी धोकदायक, तर भारतासाठी निर्णायक ठरली.
अ‍ॅडीलेड ओव्हलवर अख्खा भारत : जगभरात कोठेही गेले तरी भारतीय संघाला चाहत्यांचा भरपूर पाठिंबा मिळतो. भारत-पाक सामनाही याला अपवाद नव्हता. अ‍ॅडीलेड ओव्हलवर प्रचंड संख्येने भारतीय प्रेक्षक दिसत होते, जणुकाही भारतातील कोणत्यातरी शहरात सामना सुरु आहे असेच भासत होते. सामन्यापूर्वी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत म्हटले जाते. यावेळी ‘जण-गण-मन’ चा आवाज इतका घुमला होता की, पाकिस्तानचे निम्मे अवसान त्याचवेळी गळाले असेल. हा व्हिडीओ वॉटसअपवरुन आजही फिरतो आहे.

विराट कोहली :
या सामन्यात विराट कोहलीने १२६ चेंडूंना सामोरे जाताना १०७ धावांची खेळी केली. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी करणारा विराट कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला.

शिखर धवन :
भारताचा सलामीवीर शिखर धवनचा फॉर्म हा अनेक दिवस चिंतेचा आणि टीकेचा विषय बनला होता. पण या सामन्यात त्याने ७३ धावा केल्या. धवनची गाडी योग्यवेळी रुळावर आली आणि त्याने भारतीय संघालाही विजयाचा मार्ग दाखविला.

१४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डे ला सुरु झालेली विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची साखळी फेरी एक महिन्यानंतर आता संपली आहे. महिनाभराच्या मंथनातून अव्वल आठ संघ आता निकाराची लढाई लढण्यास सज्ज झाले आहेत. या महिनाभरात क्रिकेटने अनेक चमत्कारी रुपे दाखविली. भारताने पाकिस्तानविरुध्द सहावा विजय मिळवून आपण वर्ल्डकपमध्ये अजिंक्य असल्याचे सिध्द केले तर आयर्लंडने विंडीजला पराभूत करुन पहिला उलटफेर नोंदविला. बांगलादेशने इंग्लंडसारख्या मोठ्या संघाला स्पर्धेतून बाहेर काढून उपांत्यपूर्व फेरी गाठली. या साखळी फेरीचा हा आढावा.

सुरेश रैना :
मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने या सामन्यात ५६ चेंडूत ७४ केल्यामुळे धावसंख्येला मजबूती आली. शिवाय त्याने एकाबाजून फटकेबाजी केल्यामुळे दुसऱ्या बाजूला असणाऱ्या विराट कोहलीला शांतपणे शतक पूर्ण करता आले.

मोहम्मद शमी :
मोहम्मद शमीने आघाडीच्या जलदगती गोलंदाजाची भूमिका वठविताना सामन्यात चार बळी घेतले. त्याने आपल्या वेगात गोलंदाजी तर केलीच शिवाय लेंग्थ आणि लाईनने सगळयांना प्रभावित केले.

कॅप्टनची ‘कूल’ खेळी
स्टार परफॉर्ममर्स
मोहम्मद शमी : भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याने वेस्ट इंडीजची सलामी जोडी डेवन स्मिथ आणि ख्रिस गेल यांना तंबूत धाडून मोठी कामगिरी पार पाडली. डेथ ओव्हर्समध्ये डॅरेन सॅमी फटकेबाजीच्या मूडमध्ये येताच त्यालाही शमीने तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात त्याने ३५ धावांत तीन बळी घेतले.
जेसन होल्डर : विंडीजचे सगळे दिग्गज फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने दीडशेच्या आत संघ गुंडाळला जाईल अशी अपेक्षा असताना कर्णधार जेसन होल्डरने ६४ चेंडूत महत्त्वपूर्ण ५४ धावा केल्यामुळे संघाला १८२ पर्यंत मजल मारता आली.
महेंद्रसिंग धोनी : भारतीय संघाचा कर्णधार धोनी हा उत्कृष्ट फिनिशर समजला जातो. चेंडू आणि धावांचे प्रमाण कितीही व्यस्त असले तरी सामना फिरवण्याची ताकद धोनीकडे आहे. विंडीजविरुध्दच्या सामन्यात धावांपेक्षा चेंडू अधिक असले तरी खेळपट्टीमुळे फलंदाजांना धावा मुक्तपणे लुटता येत नव्हत्या. धोनीने ही परिस्थिीती ओळखून एकेरी-दुहेरी धावा घेत सामना आवाक्यात आणला. परिस्थिीतला शरण न जाता तिला आपले गुलाम करण्याचे धोनीचे हे कसब खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.

पहिले तीन सामने जिंकून फार्मात आणि काही अंशाने हवेत असलेल्या भारतीय संघाला वेस्ट इंडीजविरुध्दच्या सामन्याने जमिनीवर आणले. या सामन्यात १८३ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली होती. पण कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आणिबाणीच्या वेळी डोके शांत ठेवून परिस्थिती कशी हाताळावी याचा परिपाठ घालून देत ४५ धावांची निर्णायक खेळी केली. त्याच्या या कूल खेळीमुळेच भारताने या सामन्यात विजय मिळविला.
पर्थयेथील खेळपट्टी उसळी घेणारी असल्याने वेस्ट इंडीजचा कर्णधार जॅसन होल्डरने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचा डाव ४४.२ षटकांत १८२ धावांत गुंडाळला. वरकरणी हे आव्हान सोपे वाटत होते, पण विंडीज गोलंदाजांनी उसळत्या चेंडूचा मारा करीत भारतीय फलंदाजांचे कंबरडे मोडले. १३४ धावा फलकांवर लागेपर्यंत भारताचे सहा खंदे फलंदाज तंबूत परतले होते. उरला होता फक्त धोनी. त्याने अश्विनला साथीला घेत विंडीजच्या बाउन्सरचा मुकाबला केला आणि सामना जिंकून दिला.

मॅच पॉर्इंट
धोनीने गांगुलीला टाकले मागे : कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विदेशात सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकण्याचा सौरभ गांगुलीचा विक्रम या विजयाने मोडीत काढला. भारतीय संघाचा हा परदेशातील ५९ वा विजय ठरला. गांगुलीने त्याच्या नेतृृत्वाखाली ५८ सामने जिंकले होते.
संथ सुरवात : भारतीय फलंदाजांनी पहिल्या पाच षटकांत १२ धावा केल्या. २००१ पासून विंडीजविरुद्ध ही दुसरी वेळ आहे. जून २००२मध्ये पोर्ट आॅफ स्पेन येथे भारतीय फलंदाजांनी पहिल्या ५ षटकांत ११ धावा केल्या होत्या.

धोनीचा अचूक डिआरएस : उमर अकमल हा पाकिस्तानचा धोकादायक फलंदाज. जडेजाच्या चेंडूवर अकमलने ‘कट’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅटला ‘टच’ करून चेंडू धोनीच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. यावेळी त्याने स्टम्पही उडविल्या होत्या. धोनीने आणि जडेजाने अपील केले. सर्वांना वाटले स्टम्पिंगचे अपिल आहे, पंचांना शंका होती म्हणून त्यांनी अपील फेटाळून लावले. चेंडू अकमलच्या बॅटला कट झाल्याचा विश्वास धोनीला होता. त्यामुळे धोनीने वेळ न दवडता डीआरएसचा निर्णय घेतला. त्यात धोकादायक अकमलचा ‘बळी’ गेला.
उमेश यादवची मॅजिकल ओव्हर : पहिल्या
स्पेलमध्ये सपाटून मार खाणाऱ्या उमेश यादवच्या दुसऱ्या स्पेलमध्ये २३ व्या षटकांतील दुसऱ्या चेंडूवर शेहजादने आॅफ साईडला पॉर्इंटवर जोराचा फटका मारला; पण तितक्याच चपळाईने रवींद्र जडेजाने हा झेल टीपला. भारताला ज्या ‘ब्रेक थ्रू’ची गरज होती. तो उमेशने मिळवून दिला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर नव्याने आलेल्या मकसूदचा झेल सुरेश रैनाने टीपला आणि या दोन झटक्यांनी पाकिस्तान हादरला. तो पुढे सावरलाच नाही.

Web Title: India invincible ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.