शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलकांकडे कोणतीही परवानगी नाही, दुपारी ३ पर्यंत जागा रिकामी करा: मुंबई हायकोर्ट
2
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
3
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
4
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
5
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
6
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
7
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
8
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
9
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
10
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
11
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
12
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
13
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
14
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
15
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
16
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
17
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
18
शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टीईटी देणे अनिवार्य, राज्यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
19
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
20
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?

विश्वचषक पुरुष हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारताकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 02:14 IST

२०२३ साली रंगणार स्पर्धा : चौथ्यांदा स्पर्धेचे आयोजन करणारा पहिला देश

लुसाने : आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) शुक्रवारी २०२३ पुरुष हॉकी विश्वकचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताची निवड केली. भारतात सलग दुसऱ्या या स्पर्धेचे आयोजन होणार असून एकूण चौथ्यांदा भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषविणार आहे. विशेष म्हणजे असा मान मिळवणारा भारत पहिला देश ठरला.

एफआयएचच्या मते पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा भारतात १३ ते २९ जानेवारी या कालावधीत खेळली जाईल. एफआयएचची वर्षातील अखेरची बैठक शुक्रवारी झाली. त्यांच्या कार्यकारी बोर्डाने हा निर्णय घेतला. याच बैठकीत निर्णय घेण्यात आला की स्पेन व नेदरलँड १ ते २२ जुलै या कालावधीत आयोजित २०२२ महिला विश्वचषक स्पर्धेचे सहयजमान राहतील. पुरुष आणि महिला या दोन्ही विश्वचषक स्पर्धेत स्थळांची घोषणा नंतर यजमान देशांतर्फे करण्यात येईल. या निर्णयामुळे भारत पुरुषांच्या चारवेळा विश्वचषक स्पर्धांचे आयोजन करणारा पहिला देश ठरणार आहे. यापूर्वी भारतात १९८२ मध्ये मुंबई, २०१० मध्ये नवी दिल्ली आणि २०१८ मध्ये भुवनेश्वर येथे विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नेदरलँडने पुरुषांच्या तीन विश्वचषक स्पर्धांचे यजमानपद भूषविले आहे.

भारत २०२३ मध्ये स्वातंत्र्याचे ७५ वर्ष पूर्ण करणार आहे. त्यामुळे हॉकी इंडिया भारतात या खेळाचा विकास दाखविण्यासाठी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यास उत्सुक आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेच्या पुढील स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारतासह तीन देशांनी (बेल्जियम व मलेशिया) यांनी दावेदारी सादर केली होती. महिला विश्वचषक स्पर्धेसाठी पाच देशांनी जर्मनी, स्पेन, नेदरलँड, मलेशिया आणि न्यूझीलंड यांनी बोली लावली होती. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचे स्वरुप गेल्या स्पर्धेप्रमाणेच राहील. एफआयएचचे मुख्य कार्यकारी अधिकारी थिएरी वेल म्हणाले की, ‘खेळाच्या विकासा व्यतिरिक्त स्पर्धेतून मिळणाºया लाभाचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला. एफआयएचला या प्रतिष्ठेच्या स्पर्धांच्या यजमानपदासाठी शानदार बोली मिळाली होती. निर्णय घेणे कठीण होते. एफआयएचचे मुख्य लक्ष्य खेळाचा जगभर विकास करण्याचे आहे.’विश्वचषक स्पर्धेव्यतिरिक्त भारतात अलीकडच्या कालावधीत काही मोठ्या स्पर्धांचे आयोजन झाले आहे. त्यात २०१४ मध्ये एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१६ मध्ये ज्युनिअर पुरुष विश्वचषक, २०१७ मध्ये एफआयएच हॉकी विश्व लीग फायनल, २०१९ मध्ये एफआयएच पुरुष सिरिज फायनल्स आदींचा समावेश असून अलीकडेच एफआयएच हॉकी आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेचा समारोप झाला आहे.हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद म्हणाले,‘२०२३ च्या पुरुष हॉकी विश्वकप स्पर्धेच्या यजमानपदाची बोली जिंकण्यात यशस्वी ठरल्यामुळे खूश आहे. ज्यावेळी आम्ही दावेदारी सादर केली होती त्योवेळी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यला ७५ वर्षे पूर्ण होणार असल्याचा आनंद साजरा करण्याचे कारण होते. १९७५ मध्ये भारताने विश्वचषक स्पर्धेत अखेरचे जेतेपद पटकावले आहे.’‘हॉकी खेळाच्या विकासासाठी निश्चितच गुंतवणूकीची गरज आहे. त्यामुळे यजमानपदाच्या प्रत्येक बोलीमधून मिळणाºया लाभाने निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली,’ असे एफआयएचचे मुख्य कार्यकारी अधिकारी थिएरी वेल म्हणाले.

टॅग्स :HockeyहॉकीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ