भारताला ३-० ने विजयाची संधी
By Admin | Updated: December 6, 2015 01:43 IST2015-12-06T01:43:59+5:302015-12-06T01:43:59+5:30
माझ्या मते दक्षिण आफ्रिका संघ मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. विशेषता दोन कसोटी सामने गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाची मानसिक स्थिती ढासळलेली आहे.

भारताला ३-० ने विजयाची संधी
वसीम अक्रम लिहितो...
माझ्या मते दक्षिण आफ्रिका संघ मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. विशेषता दोन कसोटी सामने गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाची मानसिक स्थिती ढासळलेली आहे.
उपखंडातील संघांनाही अशा स्थितीला सामोरे जावे लागते. विशेषता आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पूर्ण शक्ती खर्ची घातलेली असते आणि त्यातही पराभव स्वीकारावा लागला तर मानसिकता ढासळते. मानसिकदृष्ट्या तुम्ही दौरा संपविण्यास प्रयत्नशील असता,
पण मनाने मात्र तुम्ही तेथे नसता. अगदी याच स्थितीतून सध्या
कोटला स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिका संघ जात आहे. दक्षिण आफ्रिकन खेळाडू सध्या तनाने येथे असले तरी मनाने मात्र नाहीत. या खेळपट्टीवर फलंदाज व गोलंदाजांसाठी या खेळपट्टीमध्ये निश्चितच काहीतरी आहे. ही काही टर्नर नाही, पण उपखंडातील खेळपट्टी आहे. दक्षिण आफ्रिका संघाने सुरुवातीलाच संधी गमावली आहे. त्यामुळे यजमान संघाला वर्चस्वाची संधी मिळाली.
रिव्हर्स सिंग कसे खेळावे हे विराट आणि अजिंक्यने द. आफ्रिकेला दाखवून दिले. इनिस्विंग निष्प्रभ ठरविण्यासाठी दोघांनी फ्रंट फूटचा वापर केला. द. आफ्रिकेचे फलंदाज उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर सराव करीत असल्याने बॅकफूटवर खेळतात. अशावेळी पायचित होण्याची शक्यता अधिक वाढते. रिव्हर्स स्विंगला बॅकफूटवर खेळणारा फलंदाज पायचित झाला म्हणून समजा. वकारने असे अनेक बळी घेतल्याचे मला आठवते. द. आफ्रिकेला चांगली सुरुवातही मिळाली नाही आणि त्यांचे फलंदाज मोठी भागीदारी करण्यातही अपयशी ठरले.
डुप्लेसिस आणि अमला हे तर फार्ममध्ये नव्हतेच. डेल स्टेनची
जखम आणि कालिसची निवृत्ती
या संघाला मागे नेऊन ठेवणारी ठरली.
प्रभावी फलंदाज एबी डिव्हिलियर्स हा देखील धावा काढण्यात अपयशी ठरला आहे. फिरकीविरुद्ध हा संघ किती अपयशी ठरला हे आपण पाहिलेच आहे. विराटऐवजी मी असतो तर चौथ्या दिवशी काही तास फलंदाजी केली असती. डाव कधी घोषित करायचा याचा निर्णय नंतर घेतला असता. या सामन्यात अद्याप १८० षटकांचा खेळ शिल्लक आहे. म्हणूनच भारताला मालिका ३-० ने खिशात घालण्याची मोठी संधी आहे. (टीसीएम)