भारताकडे 339 धावांची भक्कम आघाडी
By Admin | Updated: October 2, 2016 18:05 IST2016-10-02T15:06:58+5:302016-10-02T18:05:16+5:30
न्यूझीलंडला गुंडाळल्यानंतर भारताची आघाडीची आणि मधली फळी तंबूत परतली. विराट, रहाणे, धवन पुजारासारके खंदे फलंदाज झटपट बाद झाले

भारताकडे 339 धावांची भक्कम आघाडी
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २ : कोलकाता कसोटीच्या तिस-या दिवसअखेर भारताकडे 339 धावांची भक्कम आघाडी असून अजूनही भारताचे 2 फलंदाज बाकी आहेत. पहिल्या डावातील अर्धशतकवीर वृद्दीमान साहा(39) अवघड परिस्थितीतही मैदानावर तग धरून आहे. त्याच्यासोबत भुवनेश्वर कुमार 8 धावांवर नाबाद आहे. भारताच्या 8 बाद 227 धावा झाल्या आहेत. त्यापुर्वी रोहीत शर्माच्या जिगरबाज अर्धशतकाच्या जोरावर भारताने समाधानकारक धावसंख्या उभारली. न्यूझीलंडला गुंडाळल्यानंतर भारताची(82) आघाडीची आणि मधली फळी तंबूत परतली. विराट, रहाणे, धवन पुजारासारके खंदे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे सामन्यात मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले. उपाहारापर्यंत भारताने सांभाळून खेळ केला मात्र उपाहारानंतर किवी गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारताचे आघाडीचे फलंदाज बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत आला आहे. विजयने ७, धवनने १७ तर पुजाराने ४ धावा केल्या. तर रहाणे अवघी १ धाव करुन माघारी परतला.
तिसऱ्या दिवशी खेळपट्टीने अचानकच रंग बदलल्याचे पाहायला मिळाले. चेंडू कधी अचानक उसळी घेत आहे तर कधी प्रमाणापेक्षा खाली राहत आहे. त्यामुळे फलंदाजांना खास अडचणी येत आहेत. या बिकट परिस्थितीतही विराट कोहलीने (४६) रोहित शर्माच्या साथीने डाव सावरण्याचा संघर्षपूर्ण प्रयत्न केला. मात्र, खाली राहिलेल्या चेंडूवर विराट बाद झाल्याने ९१ धावांतच भारताचा निम्मा संघ आता तंबूत परतला.
न्यूझीलंडचा कर्णधार रॉस टेलरनेही खेळपट्टीचा रंग बघून जास्तीत जास्त वेगवान गोलंदाजांकडून गोलंदाजी करवून घेत आहे. किवी संघाकडून मॅट हेन्रीने ३ तर ट्रेंट बोल्ट याने २ गडी बाद केले आहेत.
दरम्यान, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात भक्कम आघाडी घेतली आहे. भुवी आणि महंमद शमीच्याच्या दर्जेदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा पहिला डाव २०४ धावांवर आटोपला. भारताक पहिल्या डावात ११२ धावांची आघाडी घेत दुसऱ्या कसोटी सामन्यावरील पकड मजबूत केली आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ५, महंमद शमीने ३ तर जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या आहेत.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला, त्या वेळी बीजे वॉटलिंगला (१२) जीतेन पटेल (०५) साथ खेळत होते. बीजे वॉटलिंगला २५ धावावर शमीने बाद केले तर पटेलचा अडथळा अश्विनने दूर केला. शमीने न्युझीलंडचे शेपूट गुंडाळत भारताला ११२ धावांची आघाडी मिळवून दिली. न्युझीलंडतर्फे हेन्री तीन तर बोल्ट, वॅगनर व पटेलने प्रत्येकी दोन तर सँटनरने एक बळी टिपला.
भारताने आपल्या घरच्या 250 व्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा पहिला डाव ३१६ धावांत संपुष्टात आला. पुजारा (८७) आणि रहाने (७७) आणि रिद्धिमान साहा (५४) यांनी अर्धशतकी खेळी केली.