भारताने भेदली चिनी भिंत
By Admin | Updated: September 28, 2014 01:15 IST2014-09-28T01:15:42+5:302014-09-28T01:15:42+5:30
व्ही़ आऱ रघुनाथ आणि वीरेंद्र लाकडा (प्रत्येकी 1 गोल) यांच्या शानदार गोलच्या बळावर भारतीय पुरुष हॉकी टीमने आशियाई स्पर्धेतील सामन्यात चीनची भिंत भेदताना उपांत्य फेरीत मजल मारली आह़े

भारताने भेदली चिनी भिंत
>इंचियोन : व्ही़ आऱ रघुनाथ आणि वीरेंद्र लाकडा (प्रत्येकी 1 गोल) यांच्या शानदार गोलच्या बळावर भारतीय पुरुष हॉकी टीमने आशियाई स्पर्धेतील सामन्यात चीनची भिंत भेदताना उपांत्य फेरीत मजल मारली आह़े सेमीफायनलमध्ये आता भारताची झुंज यजमान दक्षिण कोरियाशी रंगणार आह़े या लढतीत पहिली 3क् मिनिटे एकाही संघाला गोल नोंदविता आला नाही़ मात्र, त्यानंतर भारताचा ड्रॅग फ्लिकर व्ही़ आऱ रघुनाथ याने 4क् व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवून संघाला 1-क् अशी आघाडी मिळवून दिली़ या पाठोपाठ 45व्या मिनिटाला वीरेंद्रने दुसरा गोल करताना भारताची आघाडी 2-क् अशी केली़ हीच आघाडी अखेर्पयत कायम राखताना भारताने सामन्यात बाजी मारली़
जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानावर असलेल्या भारताला 27व्या क्रमांकावर असलेल्या चीनचा डिफेन्स भेदण्यात बरीच मेहनत घ्यावी लागली़ गत लढतीत पाकिस्तानकडून 1-2 ने पराभूत झालेल्या भारताला उपांत्य फेरीत मजल मारण्यासाठी केवळ हा सामना ड्रॉ करण्याची गरज होती़ मात्र, भारताने उत्कृष्ट खेळ करीत सामन्यावर नाव कोरल़े
सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल नोंदविता आला नाही़ विशेष म्हणजे या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. मात्र, त्याचा त्यांना लाभ घेता आला नाही़ भारताला या लढतीत अनुभवी ड्रॅग फ्लिकर रूपिंदर पाल सिंहची उणीव भासली़ ओमानविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे त्याला बाहेर बसावे लागल़े या लढतीत चीननेही जबरदस्त खेळ केला़ मात्र, त्यांना गोल नोंदविण्यात यश आले नाही़ भारतीय डिफेंडर्सनी त्यांचे अनेक हल्ले यशस्वीरीत्या परतवून लावल़े चीनला पहिला पेनल्टी कॉर्नर सामन्यात 5क्व्या मिनिटाला मिळाला होता़ मात्र, भारतीय गोलकिपर पी़ आऱ श्रीजेश याने प्रतिस्पर्धी खेळाडूंना गोल करू दिला नाही़ (वृत्तसंस्था)