नेमबाजीत भारताला ५ पदके
By Admin | Updated: November 4, 2015 01:30 IST2015-11-04T01:30:10+5:302015-11-04T01:30:10+5:30
भारतीय नेमबाजांनी १३ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत शानदार सुरुवात करीत पहिल्याच दिवशी पाच पदकांची कमाई केली. रंजन सोढीसह काही सिनियर खेळाडू

नेमबाजीत भारताला ५ पदके
कुवेत सिटी : भारतीय नेमबाजांनी १३ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत शानदार सुरुवात करीत पहिल्याच दिवशी पाच पदकांची कमाई केली. रंजन सोढीसह काही सिनियर खेळाडू मात्र आपापल्या गटात अपयशी ठरले.
दहा मीटर एअर रायफल प्रकारात युवा महिला संघाने एकमेव सुवर्ण जिंकून दिले. प्राची गडकरी, गायत्री पावसकर आणि आशी रस्तोगी यांच्या संघाने १२२६.६ गुणांसह बाजी मारली. कोरियाला रौप्य व बांगलादेशला कांस्य मिळाले. प्राचीने वैयक्तिक प्रकारातही कांस्य जिंकले. ज्युनियर महिलांच्या दहा मीटर एअर रायफलमध्ये माम्मी दास आणि श्रीयंका सदांगी क्रमश: चौथ्या आणि सातव्या स्थानावर राहिल्या.