नवव्या स्थानासाठी भारताची लढत कोरियाशी

By Admin | Updated: June 11, 2014 02:46 IST2014-06-11T02:46:59+5:302014-06-11T02:46:59+5:30

विश्वकप हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला नवव्या स्थानासाठी खेळल्या जाणा:या प्ले ऑफ लढतीत आशियाई चॅम्पियन दक्षिण कोरियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

India face Korea in ninth place | नवव्या स्थानासाठी भारताची लढत कोरियाशी

नवव्या स्थानासाठी भारताची लढत कोरियाशी

>द हेग : विश्वकप हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला नवव्या स्थानासाठी खेळल्या जाणा:या प्ले ऑफ लढतीत आशियाई चॅम्पियन दक्षिण कोरियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. 2क्1क् मध्ये नवी दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेत आठव्या स्थानावर असलेल्या भारताला या वेळी कामगिरीत सुधारणा करण्यात अपयश आले. 
दक्षिण कोरियाला ‘ब’ गटात 2क्12 च्या ऑलिम्पिक चॅम्पियन जर्मनी संघाविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात 1-6 ने पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण कोरियाला गटात पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. दक्षिण कोरियाला या स्पर्धेत चार सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत अनिर्णित राखत केवळ एक गुण मिळविता आला. दक्षिण आफ्रिका संघ या गटात तळाच्या स्थानावर राहिला. 
पहिल्या दोन सामन्यांत अखेरच्या क्षणी गोल स्वीकारीत पराभव पत्करणा:या भारतीय संघाची ‘अ’ गटात पाचव्या स्थानावर घसरण झाली. भारतीय संघाने पाच सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळविला तर एक सामना अनिर्णित राखला. इंग्लंडने 69 व्या मिनिटाला भारताविरुद्ध विजय गोल नोंदविला होता. इंग्लंडने सोमवारी बेल्जियमचा 3-2 ने पराभव करीत उपांत्य फेरीत स्थान मिळविले.  भारतीय संघ आशिया कप स्पर्धेच्या अंतिम लढतीत कोरियाविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यास उत्सुक आहे. भारताप्रमाणो कोरिया संघालाही अखेरच्या क्षणी गोल स्वीकारणो महागात पडले.  दक्षिण कोरियाविरुद्ध खेळल्या जाणा:या लढतीपूवी बोलताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श म्हणाले, की भारतीय खेळाडूंना प्रत्येक लढतीतून शिकण्याची गरज आहे. त्याचप्रमाणो यानंतर होणा:या लढतीवर लक्ष केंद्रित करणो आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: India face Korea in ninth place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.