अझलान शाह हॉकी स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक
By Admin | Updated: April 15, 2016 20:22 IST2016-04-15T19:39:08+5:302016-04-15T20:22:06+5:30
पाच वेळेचा चॅम्पियन भारत संघाला स्पर्धेत अद्याप सातत्यपूर्ण कामगिरी करू शकला नव्हता पण आज मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत मलेशियाचा ६-१ अशा फरकाने धुरळा उडवत अंतिम फेरित धडक मारली

अझलान शाह हॉकी स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
इपोह, दि. १५ - न्यूझीलंडकडून पराभूत होताच समीकरण बिघडल्यानंतर आज भारतीय संघाने २५व्या अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेत मलेशियाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. पाच वेळेचा चॅम्पियन भारत संघाला स्पर्धेत अद्याप सातत्यपूर्ण कामगिरी करू शकला नव्हता पण आज मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत मलेशियाचा ६-१ अशा फरकाने धुरळा उडवत अंतिम फेरित धडक मारली. अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ सलग पाच विजयांसह १५ गुण घेऊन अंतिम फेरीत दाखल झालेला आहे.
'करो या मरो'च्या लढतीत भारताने आपला खेळ उंचावत मलेशियाचा दारुण पराभव करत सातव्या वेळेस अझलान शाह हॉकी स्पर्धेत अंतिम फेरित धडक मारली. राऊंड रॉबिन सामन्यात मलेशियाचा पराभव केल्यामुळे गुणतालिकेत भारताने माजी विजेता न्युझीलंडला मागे टाकत गुणतालिकेत आरले स्थान मजबुत केले.
भारताचा अंतिम सामना विश्वविजेता ऑस्ट्रेलियाच्या संघाबरोबर होणार आहे. ऑस्ट्रेलियाने कॅनडाला ३-० ने हरवत अंतिम सामन्यात धडक मारली. भारताचे १२ तर न्युझीलंडचे ११ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ ८ वेळा अझलान शाह हॉकी स्पर्धेत अजिंक्य राहिलेला आहे. गेल्या अझलान शाह हॉकी स्पर्धेत भारताने कांस्य पदक तर ऑस्ट्रेलियाने उपविजेते पद मिळवलं होतं.
मलेशिया विरुद्धच्या सामन्यात भारताकडून एस वी सुनीलने दुसऱ्या, हरजीत सिंहने : सातव्या, रमनदीप सिंह २५ आणि ३९ व्या, दानिश मुज्तबा २७व्या, तलविंदर सिंह ५०व्या मिनीटाला गोल करतभारताला आघाडी मिळवून दिली. मलेशियाकडून शाहरिल सबाने ४६व्या मिनीटाला एकमेव गोल केला.