भारत ऑस्ट्रेलियाकडून क्-4 ने पराभूत
By Admin | Updated: June 10, 2014 01:18 IST2014-06-10T01:18:19+5:302014-06-10T01:18:19+5:30
भारताला सोमवारी एफआयएच पुरुष हॉकी विश्वकप स्पर्धेत साखळीतील शेवटच्या सामन्यात गतचॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्-4 ने पराभव स्वीकारावा लागला.

भारत ऑस्ट्रेलियाकडून क्-4 ने पराभूत
>हेग : भारताला सोमवारी एफआयएच पुरुष हॉकी विश्वकप स्पर्धेत साखळीतील शेवटच्या सामन्यात गतचॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्-4 ने पराभव स्वीकारावा लागला. आता भारताला नवव्या-दहाव्या स्थानासाठी प्ले-ऑफमध्ये खेळावे लागेल.
ऑस्ट्रेलियाने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना सुरुवातीच्या 22 मिनिटांमध्ये 4 गोल नोंदविले, पण त्यानंतर भारतीय संघाने बचाव अभेद्य करीत प्रतिस्पर्धी संघाला गोल नोंदविण्याची संधी दिली नाही.
ऑस्ट्रेलियातर्फे तिस:या मिनिटाला किरण गोवर्सने मैदानी गोल नोंदवित संघाचे खाते उघडले. त्यानंतर तीन गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविल्या गेले. ािस सिरिएलोने दोन तर जेरेमी हेवार्डने एक गोल केला. ऑस्ट्रेलिया संघाने साखळी फेरीत सलग पाचवा विजय मिळवित एकूण 15 गुणांची कमाई करताना गटात अव्वल स्थान कायम राखले. ऑस्ट्रेलिया संघ प्रशिक्षक चाल्र्सवर्थ यांना विश्वविजेतेपदाची भेट देण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भारताने साखळी फेरीत चार गुणांची कमाई केली. भारताने मलेशियाविरुद्ध विजय मिळविला तर स्पेनविरुद्धची लढत अनिर्णीत राखली.
दरम्यान, स्पेनने अखेरच्या साखळी सामन्यात मलेशियाचा 5-2 ने पराभव केला. स्पेन संघाने पाच गुणांची कमाई करताना गटात चौथे स्थान पटकाविले. भारत पाचव्या स्थानावर रेलिगेट झाला. भारताला आता नवव्या-दहाव्या स्थानासाठी खेळावे लागणार आहे. भारताला ‘ब’ गटातील पाचव्या स्थानावर राहणा:या संघासोबत लढत द्यावी लागेल. भारताला आशियाई चॅम्पियन दक्षिण कोरिया किंवा दक्षिण आफ्रिका संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.