पहिल्याच सामन्यात भारत पराभूत, ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून विजय
By Admin | Updated: January 12, 2016 16:45 IST2016-01-12T16:25:32+5:302016-01-12T16:45:15+5:30
स्टीव्ह स्मिथ (१४९) व जॉर्ज बेलीच्या (११२) शानदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर ५ गडी राखून विजय मिळवला.

पहिल्याच सामन्यात भारत पराभूत, ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून विजय
>ऑनलाइन लोकमत
पर्थ, दि. १२ - कर्णधार स्टीव्ह स्मिथ (१४९) आणि जॉर्ज बेली (११२) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ४ चेंडू व ५ गडी राखून पराभव केला. भारताच्या ३१० धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने ४९.२ षटकांत ५ गडी गमावत पूर्ण केल्याने पहिल्या सामन्यातच भारताल पराभवाचा धक्का बसला. भारतातर्फे सरनने ३ तर अश्विनने २ बळी टिपले. दरम्यान या पराभवामुळे भारताचा सलामीवीर रोहित शर्माची नाबाद १७१ धावांची खेळी वाया गेली.
भारताच्या ३१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात अडखळत झाली, प्रारंभीच फिंच (८) आणि वॉर्नरच्या (५) रुपाने दोन बळी मिळाल्याने भारताच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. मात्र त्यानंतर आलेला जॉर्ज बेली आणि स्टीव्ह स्मिथ यांनी भारतीय गोलंदाजी चोपून काढत शतके झळकावली आणि ऑस्ट्रेलियाला विजयाच्या समीप नेले. ११२ धावांवर खेळताना बेली अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला २६३ धावांवर तिसरा धक्का बसला तर त्यानंतर अवघ्या १० धावांनंतर २७३ धावांवर मॅक्सवेलच्या (६) रुपाने ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी गमावला. त्यानंतरही कर्णधार स्मिथने फटकेबाजी सुरूच ठेवत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या अगदी समीप नेले, मात्र दीडशतकापासून अवघ्या एका धावेच्या अंतरावर असताना तो (१४९) सरनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५ चेंडूमध्ये अवघ्या २ धावांची गरज होती. त्यानंतर मार्श (१२) आणि फॉकनरने (१) विजयाची औपचारिकता पूर्ण केली आणि ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिला विजय नोंदवला.
तत्पूर्वी सलामीवीर रोहित शर्माच्या १७१ तर विराट कोहलीच्या ९ धावांच्या जोरावर भारताने ३०९ धावा केल्या. ले आहे. ऑस्ट्रेलियातर्फे फॉकनरने २ तर हेझलवूडने १ बळी टिपला.