पुरुष हॉकी सामन्यात भारताने अर्जेंटिनाला 2-1 केलं पराभूत, भारताचा क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश

By Admin | Updated: August 9, 2016 22:01 IST2016-08-09T21:44:46+5:302016-08-09T22:01:05+5:30

ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेतल्या तिस-या फेरीत भारतानं अर्जेंटिनाला 2-1नं पराभूत केलं आहे.

India defeated Argentina 2-1 in the men's hockey match, India's quarter-finals | पुरुष हॉकी सामन्यात भारताने अर्जेंटिनाला 2-1 केलं पराभूत, भारताचा क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश

पुरुष हॉकी सामन्यात भारताने अर्जेंटिनाला 2-1 केलं पराभूत, भारताचा क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश

ऑनलाइन लोकमत
रिओ दी जनेरियो, दि. 9 - भारताला चौथ्या दिवसाला हॉकीमध्ये सूर गवसला आहे. ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेतल्या तिस-या पूल ब इन्काऊंटरच्या फेरीत भारतानं अर्जेंटिनाला 2-1नं पराभूत केलं आहे. 2009नंतर भारतानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये अर्जेंटिनाला पराभवाची धूळ चारली आहे. या सामन्यात भारताकडून चिंगलेनसाना कांगूजाम यानं आठव्या तर कोथाजित सिंह खादानबामनं 35व्या मिनिटाला गोल केला. अर्जेंटिनाचा खेळाडू गोंजालो पिलाटनं 49व्या मिनिटाला गोल केला. दुस-या सामन्यात भारताला जर्मनीकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता. भारतानं याआधी आयर्लंडवर विजय मिळवून शानदार सुरुवात केली होती.

Web Title: India defeated Argentina 2-1 in the men's hockey match, India's quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.