भारत ओमानकडून १-२ ने पराभूत
By Admin | Updated: June 12, 2015 03:41 IST2015-06-12T03:41:14+5:302015-06-12T03:41:14+5:30
अनुभवहीन भारतीय फुटबॉल संघ कडव्या संघर्षानंतर २०१८ च्या विश्वचषक पात्रता फेरीच्या प्राथमिक फेरीत ओमानकडून शुक्रवारी १-२ ने पराभूत झाला

भारत ओमानकडून १-२ ने पराभूत
बंगळुरु : अनुभवहीन भारतीय फुटबॉल संघ कडव्या संघर्षानंतर २०१८ च्या विश्वचषक पात्रता फेरीच्या प्राथमिक फेरीत ओमानकडून शुक्रवारी १-२ ने पराभूत झाला. ओमान फिफा रँकिंगमध्ये १०१ व्या, तर भारत १४१ व्या स्थानावर आहे.
प्रतिस्पर्धी संघाकडून पहिल्याच मिनिटाला कासिद सैद याने आणि ४० व्या मिनिटाला पेनल्टीवर इमाद हल होसानी याने गोल नोंदविला. भारताकडून एकमेव गोल २६ व्या मिनिटाला सुनील छेत्रीने नोंदविला. क्रांतिवीरा स्टेडियममध्ये जवळपास १९ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत ६९ व्या मिनिटाला भारताने बरोबरी साधली होती पण लाईन्समनने रॉबिनसिंगचा गोल आॅफ साई ठरविला. सी. के. विनीत याने दोन्ही फ्लँककडून हल्लाबोल करीत ओमानच्या गोलफळीवर ताकदीने शॉट मारला, पण बचावफळीतील सल्लाम अमूर याने चेंडू थोपविण्याआधी रॉबिन आॅफ साईड आल्याचे लाईन्समनचे मत होते. भारतीय कोच स्टीव्हन कॉंस्टेन्टाईन यांनी सामन्यात चार खेळाडूंचे पदार्पण केले. अनुभवहीन भारतीय संघाला याचा
फटका बसला. पहिल्याच मिनिटाला संघाविरुद्ध गोल झाला. (वृत्तसंस्था)