भारत वर्ल्डकप जिंकू शकतो : सचिन
By Admin | Updated: November 9, 2014 02:17 IST2014-11-09T02:17:18+5:302014-11-09T02:17:18+5:30
पुढील वर्षी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात होणारा एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप भारत जिंकू शकतो़ या वर्ल्डकपमध्ये फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरेल,

भारत वर्ल्डकप जिंकू शकतो : सचिन
लंडन : पुढील वर्षी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात होणारा एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप भारत जिंकू शकतो़ या वर्ल्डकपमध्ये फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे मत भारताचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आह़े
लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर आपल्या आत्मकथेच्या प्रकाशनाप्रसंगी सचिनला ‘2क्15च्या वर्ल्डकपचा दावेदार कोण?’ असे विचारले असता तो म्हणाला, की निश्चितच वन-डेत भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आह़े त्यामुळे आगामी विश्वचषकातही हा संघ बलाढय़ संघांना पाणी पाजू शकतो़ विशेष म्हणजे, या स्पर्धेत फिरकी गोलंदाज विशेष भूमिका बजावतील, अशी आशाही मास्टर ब्लास्टरने व्यक्त केली़
सचिन पुढे म्हणाला, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि भारतीय संघ पुढील वर्षी होणा:या वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत मजल मारू शकतात़ सध्या ज्या प्रकारे इंग्लंड संघाची कामगिरी होत आहे, त्यावरून हा संघ वर्ल्डकपमध्ये विशेष कामगिरी करील असे वाटत नाही.(वृत्तसंस्था)
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणा:या या स्पर्धेत वेगवान गोलंदाजांचा बोलबाला राहील, असे अनेकांचे मत आह़े मात्र, मैदानाचा आकार बघता या खेळपट्टय़ांवर फिरकी गोलंदाज फलंदाजांवर वर्चस्व राखू शकतात़