भारताचा विंडीजवर मालिका विजय
By Admin | Updated: October 18, 2014 01:26 IST2014-10-18T01:26:32+5:302014-10-18T01:26:32+5:30

भारताचा विंडीजवर मालिका विजय
>धर्मशाला: विराट कोहली (127) याच्या शतकीय खेळीनंतर भुवनेश्वर कुमार आणि अक्षय पटेल यांच्या किफायतशीर गोलंदाजीच्या जोरावर भारताने चौथा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये वेस्ट इंडीजला 59 धावांनी नमवत मालिका 2-1 ने जिंकली़ या विजयामुळे आता पाचवा सामना होणार नसल्याचे पाहुणा संघ या दौर्यातून बाहेर पडला आह़े कोहलीशिवाय सुरेश रैना 71, अजिंक्य रहाणे 68 यांच्या अर्धशतकाच्या मदतीने भारताने 6 बाद 330 धावा केल्या़ प्रत्युत्तरात वेस्टइंडीजचा संघ मालरेन सॅम्युअल्सच्या 112 धावांच्या शतकीय खेळीनंतरही 48 षटकात 271 धावात गारद झाला़ भारताकडून भुवनेश्वर आणि अक्षर यांनी प्रत्येकी दहा षटकात अनुक्रमे 25 आणि 26 धावा देताना दोन-दोन बळी घेतल़े