सातगडी राखून भारताची लंकेवर मात
By Admin | Updated: November 6, 2014 21:34 IST2014-11-06T21:34:37+5:302014-11-06T21:34:37+5:30
लंकेचे २७५ धावांचे आव्हान भारताने सहज पूर्ण केले आहे. भारताचा फलंदाज अंबती रायडू याने दमदार फलंदाजी करत १० चौकार व ४ षटकार लगावत १२१ धावा करत लंकेच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले

सातगडी राखून भारताची लंकेवर मात
ऑनलाइन लोकमत
आमदाबाद, दि. ६ - लंकेचे २७५ धावांचे आव्हान भारताने सहज पूर्ण केले आहे. भारताचा फलंदाज अंबती रायडू याने दमदार फलंदाजी करत १० चौकार व ४ षटकार लगावत १२१ धावा करत लंकेच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. तसेच खेळ संपण्यासाठी ४० चेंडू बाकी असताना विराट कोहली अर्धशतक पूर्ण व्हायला एक धाव बाकी असताना बाद झाला. परंतू त्याच्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या रविंद्र जडेजाने एक धाव काढत आत्मविश्वासाने रायडूला खेळण्यास सहकार्य केले. १० चौकार व एक षटकार लगावत शिखर धवन धावांचे शिखर गाठत असतानाच प्रियरंजंनकडे झेल गेल्याने बाद झाला. भारतीय संघात सर्वात कमी धावा अजिंक्य रहाणेने केल्या. १९ चेंडूत फक्त एक चौकार मारत रहाणेने ८ धावा केल्याने रसिकांचे त्याने अपेक्षाभंग केले. लंकेचा गोलंदाज सुरज रणदिव याने सर्वाधीक म्हणजेच ६६ धावा दिल्या.