ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - दक्षिण आफ्रिकेच्या ४३८ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ ३६ षटकात २२४ धावात तंबूत परतला. द.आफ्रिकेने भारताचा २१४ धावांनी लाजिरवाना पराभव केला. द.आफ्रिकेने भारतात प्रथमच मालिका विजय मिळवत गांधी-मंडेला एकदिवसीय मालिका ३-२ने खिशात घातली. भारताकडून रहाणे आणि शिखर धवनने एकतर्फी लढत दिली.
फलंदाज येत होते आणि हजेरी लाऊन जात होते. फलंदाजानी अनावश्क फटके मारुन आपल्या विकेट आफ्रिकेच्या गोलंदाजाना बहाल केल्या. सुरवातीलाच रोहित शर्मा (१६) व कोहली (७) हे दोन खेळाडू स्वस्तात बाद झाल्यानंतर. शिखर धवन (६०) व रहाणे (८७) यांनी शतकीय भागिदारी करत संघाला सावरले असे वाटत असतानाच शिखर धवन खराब फटका मारुन बाद झाला, त्यांनतर आलेला रैनाही फार काळ मैदानावर टिकला नाही. १२ धावाकाडून तंबूत परतला. राहणेने एकतर्फी झुंज दिली पण दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्यामुळे तो आपल्या वैयकतिक ८७ धावावर बाद झाला. कर्णधार धोणी २३ धावा काढून तंबूत परतला. आफ्रिकेच्या गोलंदाजानी भारताचे शेपूट झटपट बाद केले, अक्षर पटेल (५), हरभजन(०), कुमार(१) अमित मिश्रा(४) धावा काढून बाद झाले.मोहित शर्मा ०० धावावर नाबाद राहिला. आफ्रिकेतर्फे रबाडाने सर्वाधिक ४ बळी घेतले, त्याला स्टेन(३), इमरान ताहिर(२), अॅबॉट(१) ने चांगली साथ देत भारतीय फलंदाजाना घरचा गस्ता दाखवला.
त्यापुर्वी, डी कॉक (१०९), डू प्लेसिस (नाबाद १३३) व डी व्हिलीयर्स (११९) या तिघांनी भारतीय गोलंदाजांना झोडपून काढत शतके केल्याने दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी ४३९ धावांचे लक्ष्य ठेवले. आफ्रिकेने ५० षटकांत ४ गडी गमावून ४३८ धावा केल्या.
भारतविरुद्धच्या पाचव्या व अंतिम एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज हाशिम अमला अवघ्या २३ धावांवर बाद झाल्याने त्यांना पहिला धक्का बसला. मात्र त्यानंतर डी कॉकने (१०९) फटकेबाजी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. मात्र शतक पूर्ण झाल्यावर अवघ्या काही वेळातच तो बाद झाला. त्यानंतर डू प्लेसिसने (नाबाद १३३) भारतीय गोलंदाजांना अक्षरश: झोडपून काढलं, पण १३३ धावांवर खेळत असताना तो जखमी होऊन तंबूत परतला. त्यानंतर एबी डी व्हिलियर्सने ५७ चेंडूत शतक ठोकून एकदिवसीय कारकिर्दीतील २३ वे तर भारतविरुद्धच्या मालिकेतील तिसरे शतक पूर्ण केले. ४६ व्या षटकांत तो बाद झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ३८४ इतकी होती. त्यानंतर मिलरने फटकेबाजी केल्याने आफ्रिकेवे चारशेचा टप्पा सहज पार केला आणि अखेर ५० षटकांत ४ बाद ४३८ अशी वानखेडे मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या उभारली.
भारतातर्फे मोहित शर्मा, सुरेश रैना, हरभजन सिंग आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी १ बळी टिपला. भुवनेश्वर कुमारने १० षटकांत दिलेल्या तब्बल १०६ धावा भारताला चांगल्याच महागात पडल्या.