हॉकी स्पर्धेत भारताची न्यूझीलंड वर मात
By Admin | Updated: October 7, 2015 18:09 IST2015-10-07T18:01:24+5:302015-10-07T18:09:17+5:30
भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला ३-१ ने हरवून चार सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

हॉकी स्पर्धेत भारताची न्यूझीलंड वर मात
ऑनलाइन लोकमत
नेल्सन, दि. ७ - भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला ३-१ ने हरवून चार सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारताने किवीकडून मिळालेल्या पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढत मालिकेत शानदार पुनरागमन केले.
सामन्याच्या सुरवातीपासुनच भारतीय संघाने आक्रमक खेळ करत कीवी संघावर दडपण आणले. सामन्या दहाव्या मिनीटाला भारताला पॅनल्टी कॉर्नर मिळाला मात्र खेळाडू त्याचा फायदा घेऊ शकले नाहीत. त्यानंतर भारतीय टीम आधिक आक्रमक झाली. १३व्या मिनीटाला वीरेन्द्र लाकड़ा ने पहिला गोल करत आघाडी मिळवली. पहिल्या हाप मध्ये भारत ०-१ ने आघाडीवर होता. त्यांनतर भारताने नियमित आंतराने गोल केले. किवीने ४५व्या मिनीटाला एकमेव गोल केला. भारताकडून गुरंजिदर सिंह, मनप्रीत सिंह, ललित उपाध्याय, श्रीजेश यांनी चागंला खेळ केला.
न्यूझीलंड ए टीमच्या विरोधात मागील दोन सराव सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. मात्र राष्ट्रीय संघाचे आव्हान भारताला पेलवले नाही. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ०-२ ने विजय मिळवला होता.सामन्याच्या सुरूवातीला दोन्ही संघांनी आक्रमकता दाखवली. मात्र न्यूझीलंडने भारतीय संघाला आघाडी मिळू देण्याची कोणतीही संधी दिली नाही.