भारताची न्यूझीलंडवर ३-० गोलनी मात

By Admin | Updated: July 21, 2015 09:12 IST2015-07-21T00:45:35+5:302015-07-21T09:12:31+5:30

हरमनप्रीतसिंगच्या दोन शानदार गोलच्या बळावर भारतीय पुरुष संघाने वाल्वो इंटरनॅशनल अंडर २१ वर्षांखालील हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडचा एकतर्फी लढतीत

India beat New Zealand by 3-0 | भारताची न्यूझीलंडवर ३-० गोलनी मात

भारताची न्यूझीलंडवर ३-० गोलनी मात

बेदा (हॉलंड) : हरमनप्रीतसिंगच्या दोन शानदार गोलच्या बळावर भारतीय पुरुष संघाने वाल्वो इंटरनॅशनल अंडर २१ वर्षांखालील हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडचा एकतर्फी लढतीत ३-० असा धुव्वा उडवला. त्याचबरोबर, भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला.
भारताने रविवारी झालेल्या या लढतीत न्यूझीलंडवर वर्चस्व राखले. ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीतने सहाव्या आणि ४१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले, तर सिमरनजितसिंगने २९व्या मिनिटाला गोल केला. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी एकमेकांना चांगली टक्कर दिली; परंतु भारतीय संघाने सातत्याने आक्रमक व्यूहरचना आखताना किवी संघाला खिळवून ठेवले. या आक्रमक पवित्र्याचा भारताला सहाव्या मिनिटाला फायदा झाला आणि हरमीनप्रीतने पहिल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर २९व्या मिनिटाला सिमरनजितने भारतासाठी दुसरा गोल करताना आघाडी दुप्पट केली.
उत्तरार्धात मजबूत आघाडी मिळवलेल्या भारताने उत्तरार्धातही दबदबा कायम ठेवला आणि अधिक आक्रमक पवित्रा अवलंबला. भारतीय खेळाडू जास्त वेळ चेंडू आपल्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी ठरले आणि भारताला ४१व्या मिनिटाला एक आणखी पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्याचे पुन्हा एकदा गोलमध्ये रूपांतर करून ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीतने भारताची आघाडी ३-० अशी वाढवली. त्यानंतर ही आघाडी भारताने अखेरच्या मिनिटापर्यंत कायम ठेवली आणि सलग दुसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने गेल्या लढतीतही जर्मनीचादेखील ३-० असा
धुव्वा उडवला होता. भारताची
पुढील लढत मंगळवारी येथे बेल्जियमविरुद्ध होईल.(वृत्तसंस्था)

Web Title: India beat New Zealand by 3-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.