भारत ९२ धावांवर गार, आत्ता भिस्त गोलंदाजांवर

By Admin | Updated: October 5, 2015 20:52 IST2015-10-05T20:52:41+5:302015-10-05T20:52:41+5:30

फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेस ९३ धावांचे मोजकेच अव्हान दिले. भारतीय फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजासमोर २० षटकेही खेळू शकला नाही

India beat India by 92 runs | भारत ९२ धावांवर गार, आत्ता भिस्त गोलंदाजांवर

भारत ९२ धावांवर गार, आत्ता भिस्त गोलंदाजांवर

 ऑनलाइन लोकमत

कटक , दि. ५ - फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेस ९३  धावांचे मोजकेच अव्हान दिले. भारतीय फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजासमोर २० षटकेही खेळू शकला नाही, भारताचे चार फलंदाच ०० धावावर बाद झाले. महेंद्रसिंह धोनीने ३ फिरकी गोलंदाज खेळवले आहेत. पुढील लढाई गोलदांजाच्या कामगीरीवर निर्भीड आहे. चागंल्या सुरवातीनंतर भारतीय फलदांजाने खराब फटके मारत यजमान संघाना आपल्या विकेट बहाल केल्या. पहिल्या सामन्यातील शतकवीर रोहित शर्मा(२२) आणि महत्वपुर्ण खेळी करणारा विराट (०१) धावबाद झाले. तर रैना(२२), धवन(११), धोनी(०५), रायडू(०), पटेल(०९), हरभजन(०) यांनीही निराश केले. अश्विन ने ११ धावांचे योगदान दिले. 
दक्षिण आफ्रिकाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजाने तो सार्थ ठरवला, दक्षिण आफ्रिकातर्फे अ‍ॅल्बी मोर्केल ०३, इम्रान ताहिर ०२, ख्रिस मॉरिस ०२ आणि कॅगिसो रबादा ०१ बळी मिळवले.
> उभय संघ  - 
भारत :- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, अक्षर पटेल, रविचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, हरभजन सिंग 
दक्षिण आफ्रिका :- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, एबी डीव्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, फरहान बेहारडीन, मिलर,  कॅगिसो रबादा, केली एबट,  इम्रान ताहिर, ख्रिस मॉरिस, अ‍ॅल्बी मोर्केल 
 

Web Title: India beat India by 92 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.