भारताची अंतिम फेरीत धडक
By Admin | Updated: February 11, 2017 00:36 IST2017-02-11T00:36:32+5:302017-02-11T00:36:32+5:30
गतविजेत्या भारताने अंधांच्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना श्रीलंकेचा १० विकेट्सने धुव्वा उडवला.

भारताची अंतिम फेरीत धडक
हैदराबाद : गतविजेत्या भारताने अंधांच्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना श्रीलंकेचा १० विकेट्सने धुव्वा उडवला. जे. प्रकाश (नाबाद ११५) व अजय कुमार रेड्डी (नाबाद ५१) यांच्या जोरावर भारताने दिमाखदार कामगिरी केली.
भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला १९.२ षटकात १७४ धावांत गुंडाळले. सुरंगा संपत (४९ धावा) व चेंदाना देशप्रिया (४२) यांच्या फटकेबाजीमुळे लंकेला समाधानकारक मजल मारता आली. भारताकडून रणबीर पवार, सुनील यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तसेच, लंकेचे चार फलंदाज धावबाद झाले. यानंतर माफक आव्हानाचा पाठलाग करताना १३ षटकातच भारताने विजय मिळवला. प्रकाशने ५२ चेंडूत नाबाद ११५ धावांचा तडाखा दिला. दुसरीकडे अजयनेही नाबाद अर्धशतकी दणका दिला. (वृत्तसंस्था)