भारताची इंग्लंडवर ६ विकेटने मात

By Admin | Updated: August 30, 2014 21:58 IST2014-08-30T21:58:18+5:302014-08-30T21:58:18+5:30

भारतविरूध्द इंग्लंड यांच्यात झालेल्या तिस-या वन-डेमध्ये भारताने इंग्लंडवर ६ विकेटने मात करीत विजय मिळविला. इंग्लंडने ठेवलेले २२८ धावांचे लक्ष्य भारताने ४ गडी गमावत पूर्ण केले.

India beat England by 6 wickets | भारताची इंग्लंडवर ६ विकेटने मात

भारताची इंग्लंडवर ६ विकेटने मात

ऑनलाइन लोकमत 
नॉटींघम, दि. २९ - भारतविरूध्द इंग्लंड यांच्यात झालेल्या तिस-या वन-डेमध्ये भारताने इंग्लंडवर ६ विकेटने मात करीत विजय मिळविला.  इंग्लंडने ठेवलेले २२८ धावांचे लक्ष्य भारताने ४ गडी गमावत पूर्ण केले. 
नाणेफेकीचा कौल भारताने लागताच कर्णधार महेंद्र सिंग धोनीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्लंडला ५० षटकात २२७ धावा करता आल्या. भारताकडून सर्वाधिक ३ विकेट आर. अश्विनने घेतल्या तर भुवनेश्वर कुमार, सुरेश रैना, रायडू आणि जाडेजा यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आले. २२८ धावांचे आव्हान पेलण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. शिखर धवन अवघ्या १६ धावावर बाद झाला. परंतू त्यानंतर भारताने डाव सावरत इंग्लंडचे आव्हान पूर्ण केले. भारताकडून आजिंक्य राहणे ४५, विराट कोहली ४०, सुरेश रैना २४, रवींद्र जाडेजा नाबाद १२ तर रायडू नाबाद ६४ धावांच्या बळावर भारताने इंग्लंडचा पराभव केला. दरम्यान, इंग्लंडविरूध्द भारत यांच्यातील वन-डे सामन्यात भारताने २-० ने आघाडी घेतली आहे. 

 

Web Title: India beat England by 6 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.